नाशिक राष्ट्रवादी युवक काँग्रेस व मोरया फाऊंडेशनच्या वतीने पळसेतील इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थी, शासकीय स्पर्धा परिक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, आदींचा सत्कार करण्यात आला. तालुक्यातील पळसे गावात रविवारी (दि.30) सकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गायधनी, यांच्या वतीने दहावी परिक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात पळसे विविध कार्यकारी […]
Author: Shridhar Gaidhani
ठाकरे गटाकडून बिटको विद्यालयात वृक्षारोपण
नाशिक । पर्यावरणाचा समतोल राखावा यासाठी ठाकरे गटाचे नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून युवा सेनेच्या वतीने शहरातील बिटको विद्यालयाच्य़ा प्रांगणात ठाकरे गटाच्या पदाधिका-यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. सीबीएस परिसरातील वाय.डी. बिटको हायस्कूलच्या प्रांगणात शुक्रवार (दि.28) वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जेष्ठ नेते दत्ता गायकवाड, […]
लोकसभा निवडणुकीत मताधिक्य, राष्ट्रवादी कडून शाबासकीची थाप
नाशिक । लोकसभा निवडणुकीत नाशिक मधून महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे खा. राजाभाऊ वाजे आणि दिंडोरी मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे खा. भास्कर भगरे हे महाविकास आघाडीचे दोन खासदार प्रचंड मताधिक्याने निवडून दिल्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस पदाधिका-यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या […]
..मंडाले, 2019 च्या निवडणुकीत ‘ती’ गद्दारी नव्हती का – कोथमिरे
नाशिक । देवळाली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अनेक दावेदार तयार झाले असून राष्ट्रवादीचे इच्छुक एकमेकांशी भिडताना दिसत आहे. दोन दिवसांपुर्वी लक्ष्मण मंडाले यांनी विद्यमान आमदारांवर गद्दारीचे आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे इच्छुक उमेदवार सुनील कोथमिरे यांनी मंडाले यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत देवळालीच्या मतदारांना उद्देशून लिहीलेले पत्र व्हायरल झाले आहे. देवळाली विधानसभा मतदारसंघात 2019 […]
कामगारनेते जगदीश गोडसेंची ‘पूर्व’ तयारी
श्रीधर गायधनी । नाशिक लोकसभा निवडणुकीची धुरळा बसत नाही तोच विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. नाशिक पूर्व मधून महाविकास आघाडी कडून उमेदवारी साठी प्रेस कामगार नेते जगदीश गोडसे यांनी उमेदवारीसाठी जोरदार फिल्डिंग लावली असून, विधानसभा मतदारसंघात प्रचार करणारे गोडसेंचे सहकारी, हजारो प्रेस कामगार व समर्थकामध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. एकुणच गोडसे यांनी निवडणुकीची […]
लोकसभा निवडणुक, देवळालीतील बुथ निहाय आकडेवारी
श्रीधर गायधनी । नाशिक लोकसभा निवडणूकीत शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या व माजी खासदार हेमंत गोडसे यांचे होम पीच असलेल्या देवळाली मतदारसंघातून महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खा. राजाभाऊ वाजे यांनी आघाडी घेतली, देवळाली मतदारसंघात झालेल्या मतदानात माजी खासदार हेमंत गोडसे व राजाभाऊ वाजे यांना मिळालेल्या बुथ निहाय मतदानाच्या टक्केवारी वरुन देवळालीत मतदारांनी निवडणूक हातात घेतल्याचे दिसून आले. देवळाली मतदारसंघातून माजी […]
शिंदे ग्रामपंचायत सरपंच पदी बाजीराव जाधव बिनविरोध
नाशिकरोड । शिंदे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गोरख जाधव यांच्यावर मार्च महिन्यात अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच पदावर मतदान प्रक्रियेत जेष्ठ सदस्य बाजीराव जाधव यांची बिनविरोध निवड झाली, त्यानंतर समर्थकांनी गुलाल उधळत गावातून मिरवणूक काढत जल्लोष केला. तालुक्यातील शिंदे ग्रामपंचायतीच्या सभागृहात शुक्रवारी (दि.14) सरपंच निवडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सदस्य बाजीराव जाधव […]
शिंदे गटाकडून देवळाली विधानसभेसाठी मोर्चे बांधणी
श्रीधर गायधनी । नाशिक नाशिक पुर्व राहूल ढिकले (भाजप) गोडसे-100311, वाजे- 89911 नाशिक मध्य देवयानी फरांदे (भाजप) गोडसे- 84906, वाजे-88712 नाशिक पश्चिम सीमा हिरे (भाजप) गोडसे-124827, वाजे-93617 देवळाली सरोज अहिरे (राष्ट्रवादी) गोडसे- 54064, वाजे- 81200 सिन्नर माणिक कोकाटे (राष्ट्रवादी) गोडसे- 31254, वाजे-159492 इगतपुरी हिरामण खोसकर (राष्ट्रीय काँग्रेस) गोडसे-58052, वाजे-101585 लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू […]
शिंदे-ठाकरे गटाचे नेते एकत्र..फोटो व्हायरल
नाशिक । लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत रोजच नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे, राज्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना असे चित्र पाहायला मिळत असून शिंदे गटाला धारेवर धरणा-या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे आणि शिंदे गटाचे नेते एकत्र आल्याचे फोटो व्हायरल झाल्याने एकच राजकिय खळबळ उडाली आहे. संभाजीनगर मधून महाविकास आघाडीचे उमेदवार माजी खा. चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारसभेसाठी शुक्रवारी […]
कुस्तीपटू भूषण लहामगे यांची हत्या
नाशिक । इगतपुरी तालक्यातील सांजेगाव येथील कुस्तीपटू भूषण महामगे यांची भररस्त्यात कोयत्याने वार करुन व गोळ्या घालून हत्या करण्यात आली असून फरार मारेकरी यांचा शोध घेण्यासाठी ग्रामीण पोलिसांची पथके रवाना झाल्याचे समजते. मुंबई-आग्रा महामार्गावर राजूर फाटा भागात शुक्रवारी (दि.10) दुपारी दोन च्या सुमारास सांजेगाव ता. इगतपुरी येथील कुस्तीपटू भूषण लहामगे याच्यावर हल्ला करुन कोयत्याने वार […]