नाशिक । पर्यावरणाचा समतोल राखावा यासाठी ठाकरे गटाचे नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून युवा सेनेच्या वतीने शहरातील बिटको विद्यालयाच्य़ा प्रांगणात ठाकरे गटाच्या पदाधिका-यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
सीबीएस परिसरातील वाय.डी. बिटको हायस्कूलच्या प्रांगणात शुक्रवार (दि.28) वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जेष्ठ नेते दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख विलास शिंदे, माजी आमदार वसंत गिते, माजी आमदार योगेश घोलप, युवा सेना जिल्हाप्रमुख बाळकृष्ण शिरसाठ, पदाधिकारी शंभू बागूल, सिद्धेश शिंदे, कार्यकारिणी सदस्य रुपेश कदम, युवती सेना कार्यकारिणी सदस्या प्रियंका जोशी, युवती सेना विस्तारक योगिता गायकवाड, नयना गांगुर्डे, मधू पाटील, मानसी पाटील, रामदास आहिरे, कल्पेश पिंगळे, सुदर्शन चंदानानी, आदी उपस्थित होते.