नाशिक । भाजपचे गिरीश महाजन हे नक्कीच संकटमोचन आहे, त्यांनी शेपटीला पुन्हा चिंधी लावून लंका जाळायच्या भानगडीत पडू नये, रामराज्य चांगले चालले आहे, ते नीट चालू द्या, महायुती कायमस्वरुपी टिकेल यासाठी प्रयत्न करावा असा टोला शिवसेनेचे आ.संजय शिरसाठ यांनी मंत्री महाजन यांच्या वक्तव्यावर लगावला. एका वृत्तवाहिनीवर विचारलेल्या प्रतिक्रियेवर शिरसाठ बोलत होते. महायुतीच्या नाशिक जागेवरुन शिवसेना, भाजप […]
ताज्या बातम्या
अनेक गावात भुजबळांच्या विरोधाचे बॅनर
नाशिक । लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून अद्याप उमेदवार जाहीर झालेला नसून ओबीसी नेते व राष्ट्रवादीचे जेष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा असताना सकल मराठा समाजाने ग्रामीण भागात भुजबळ यांना विरोध करणारे बॅनर लावले आहेत. सकल मराठा समाजाने अनेक गावात गावबंदीचे बॅनर लावून भुजबळ यांना गावबंदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाविकास आघाडीने शिवसेना उबाठा गटाचे […]
चिमुकल्या चेहऱ्यांवर जिव्हाळ्याच्या रंगांची उधळण
पुणे । सण – सोहळे रक्ताच्या नात्यांतील व्यक्तींसोबत साजरे करताना प्रत्येकाचा आनंद द्विगुणीत होत असतो, मात्र, ज्यांच्या जीवनातून रक्ताचे नातेच हरवले आहे अशा चिमुकल्यांच्या चेह-यावर होळी सणाच्या निमित्ताने जिव्हाळ्याचे रंग खुलविण्याचे पुण्य पुण्यातील कला परिवाराच्या पदरात पडत असते. यामुळे पुण्यातील या परिवाराचे कौतुक होत आहे. पुणे- हडपसर येथील कला परिवाराच्या वतीने वर्षभरात विविध सांस्कृतिक व […]
नाशिकची जागा शिवसेनेचीच – मुख्यमंत्री शिंदे
नाशिक । नाशिक लोकसभेच्या जागेवरुन शिवसेना आक्रमक झाली असून शिवसेनेचाच उमेदवार असल्याची भूमिका वर्षा निवासस्थानी शिवसेनेच्या नेत्यामध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला असून बुधवारी रात्री विद्यमान खा. हेमंत गोडसे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री उदय सामंत, आ.भरत गोगावले यांच्या सोबत खा. गोडसे, पदाधिकारी व समर्थकांची एक […]
लोकसभा निवडणूक वेळापत्रक 16 मार्चला होणार जाहीर
नाशिक । लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा अखेर मुहूर्त ठरला असून शनिवारी (दि.16) दुपारी तीन वाजता निवडणूक आयोगाकडून घोषणा होणार आहे. देशभरातील लोकसभा निवडणूक व काही राज्यातील विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक उद्या दुपारी तीन वाजता जाहीर करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने मागील 2019 च्या सार्वत्रिक निवडणूक वेळापत्रक 10 मार्च 2019 रोजी जाहीर केले होते, 11 एप्रिल 2019 पासून […]
स्व पंडित मोतीलाल नेहरु यांनी त्र्यंबकेश्वर दर्शन घेतल्याची नोंद -खा राहुल गांधी यांना आनंद
नाशिक । त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या खा. राहुल गांधी यांना पौरोहित्य मनोज थेटे यांनी स्व. पंडित मोतीलाल नेहरू यांचे नाव वंशावळीत आढळून आल्यानंतर काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी आनंद व्यक्त केला. स्व. मोतीलाल नेहरु यांनी त्र्यंबकेश्वर येथे भेट दिल्याचा व गांधी घराण्याचा उल्लेख असल्याचे खा. राहुल यांना दाखविले. स्व. पंडित मोतीलाल नेहरू हे माजी पंतप्रधान […]
खा. गोडसेंच्या उमेदवारीची खा.श्रीकांत शिंदे कडून घोषणा
नाशिक । प्रभू रामचंद्राचा धनुष्यबाण नाशिक मध्येच राहणार असून शिवसेनेचे खा. हेमंत गोडसे यांना तिस-यांदा लोकसभेत पाठवण्याचे आवाहन खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी नाशिक येथील मेळाव्यात करताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला. महायुती कडून नाशिक लोकसभा मतदारसंघातून भाजपाने दावा केलेला आहे. त्यानंतर दोन दिवसापुर्वी लोकसभेसाठी इच्छुक असलेले प.पू. शांतिगिरी महाराज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने चर्चांना उधान आले […]
आ. बनकरांनी शरद पवारांचे फोटो लावल्याने राजकारण तापले
नाशिक । राष्ट्रवादी व महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांची निफाड येथे सभा आयोजित केलेली आहे, या पार्श्वभूमिवर निफाड तालुक्यात अजित पवार गटाकडून शरद पवारांचे फोटो बॅनर वर लावल्याने शरद पवार गटाकडून पोलिसांत तक्रार अर्ज दिल्याने राजकारण तापले आहे. शरद पवार गटाचे युवक प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी सांगितले की, राष्ट्रवादीचे व महाविकास आघाडीचे नेते शरद […]
राष्ट्रवादीच्या तुतारी चे अनावरण
नाशिक । राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने तालुक्यातील वडनेर दुमाला येथे शासनाच्या विविध शासकीय योजनांचे तीन दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले आहे. दरम्यान पक्षाचे चिन्ह असलेल्या तुतारी चे अनावरण करण्यात आले. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शुक्रवारी (दि.8) वडनेर गेट परिसरात आयोजित शिबिराचे उद्घाटन युवतीच्या हस्ते करण्यात आले. पक्षाचे समाधान कोठुळे, डाॅ. युवराज मुठाळ, नाशिकरोड […]
महिलांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे – ससाणे
सिन्नर टोल वेज चे व्यवस्थापक दिपक वैद्य यांनी सांगितले की, महिलांसाठी टोल नाक्यावर लवकरच हिकरणी कक्ष व सॅनिटरी वेडिंग मशीन ची व्यवस्था करुन देण्यात येईल असे आश्वासन दिले. श्रीधर गायधनी नाशिक । महिला हा समाजाचा कणा असून कुटुंबाची जबाबदारी सांभाळतांना अनेक महिलांकडून आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते, कष्टकरी महिलांनी आरोग्याबाबत जागृक राहून आपल्या आहारावर लक्ष केंद्रीत […]