नाशिक । राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने तालुक्यातील वडनेर दुमाला येथे शासनाच्या विविध शासकीय योजनांचे तीन दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले आहे. दरम्यान पक्षाचे चिन्ह असलेल्या तुतारी चे अनावरण करण्यात आले.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शुक्रवारी (दि.8) वडनेर गेट परिसरात आयोजित शिबिराचे उद्घाटन युवतीच्या हस्ते करण्यात आले. पक्षाचे समाधान कोठुळे, डाॅ. युवराज मुठाळ, नाशिकरोड महिला आघाडी अध्यक्ष माधुरी ओहोळ यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला पक्षाचे नेते गजानन शेलार, नाना पिंगळे, मुन्ना अन्सारी, सुरेश दलोड, लक्ष्मण मंडाले, रतन चावला, एन.डी.गोडसे, अशोक मोगल, माजी नगरसेवक केशव पोरजे, उत्तमराव कोठुळे, सचीन आहेर, रामकृष्ण झाडे, अशोक पाळदे, संतोष गाडेकर, संजय पोरजे, निवृत्ती पोरजे, नेमीचंद चोमार, आदी उपस्थित होते.
वडनेर गेट येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकास अभिवादन करुन राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच अधिकृत चिन्ह असलेल्या तुतारी चे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.