नारी शक्ती निर्धार मेळाव्यात आदीवासी महिलांचे पारंपारिक वेशभूषेत नृत्य सादर, विधानसभा उपाध्यक्ष आ. नरहरी झिरवाळ यांनी आदिवासी नृत्यावर ठेका धरला.
श्रीधर गायधनी 8888856677
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नारी शक्ती निर्धार मेळाव्यात नाशिकच्या राष्ट्रवादी महिलांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदिवासी वाद्य पावरी व धनुष्याची अनोखी भेट देण्यात आली, यावेळी आदीवासी महिलांनी पारंपारिक वेशभूषेत नृत्य सादर केले.
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या वतीने आयोजित नारी निर्धार मेळावा गुरुवारी (दि.18) षण्मुखानंद सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला, नाशिक राष्ट्रवादीच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातून पेठ, दिंडोरी, कळवण,आदी तालुक्यातील शेकडो महिलांनी सहभाग घेतला. आदिवासी महिलांनी पारंपारिक वेशभूषेत संबळ वाद्याच्या तालावर नृत्य सादर केले. यावेळी विधानसभा उपाध्यक्ष आ. नरहरी झिरवाळ यांच्यासह अनेक पदाधिकारी नृत्यात सहभागी झाले होते. आदिवासी महिलांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पावरी वाद्य व धनुष्य व शेवंती देवून सन्मानित केले. यावेळी प्रांताध्यक्ष सुनील तटकरे, अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, अन्न, औषधे प्रशासन मंत्री धर्मारावबाबा आत्राम, बालविकास मंत्री आदिती तटकरे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आदी उपस्थित होते.