नाशिक । महायुतीच्या जागा वाटपावरुन शिवसेना मंत्री व आमदार आक्रमक झाले असून संभाजीनगर, नाशिक, ठाणे, आदी जागांच्या उमेदवारी बाबत शिवसेना आग्रही असल्याची माहीती आहे, नाशिकच्या जागेवर शिवसेना आग्रही असून उमेदवारी बाबत उद्या पर्यंत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे आ. संजय शिरसाठ यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत चर्चा झाली, जागा वाटपावरुन घटक पक्षामध्ये रस्सीखेच सुरु आहे, नाशिक सह संभाजीनगर, ठाणे आदी जागावर शिवसेनेचे उमेदवार देण्यावर बैठकीत मंत्री, आमदार आक्रमक झाले होते, यावेळी अनेक विषयावर चर्चा झाली. महायुतीच्या नेत्यांमध्ये एकसुत्रता नसल्याचे चित्र असून मित्र पक्ष युतीधर्म पाळतात का यासाठी विभाग निहाय प्रत्येक पक्षाचा एक निरीक्षक नेमणार असल्याचा निर्णय घेतला आहे.
भाजप व शिवसेनेच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी सामिल झाले, मंत्रीमंडळ विस्तारानंतर त्यांच्या वाट्याला कोणाचे मंत्रीपद गेले यावर चर्चा न करता तक्रारींचे निवारण करण्यासाठी सर्व आमदार व जिल्हाप्रमुखांच्या बैठका घेण्यात येणार आहे. या बैठकीला गेल्या विधानसभा निवडणुकीत दोन नंबरची मते मिळालेल्या उमेदवारांना बोलावण्यात येणार आहे. तक्रारींची दखल घेण्यात येवून वरिष्ठ पातळीवर निवारण केले जाणार आहे.