Blog

दोन मोठ्या समाजातील भेटणारे ‘ते’ नेते कोण ?

नाशिक । लोकसभा निवडणुकीतील मार्ग मोकळे होण्यासाठी दोन मोठ्या समाजाचे दोन महत्वपुर्ण नेते गुप्त ठिकाणी भेटले आणि तडजोड करुन मोकळे झाले, राज्याच्या राजकारणाला वेगळं वळण लागेल अशी महत्वपुर्ण घटना असल्याचे ट्विट एका राष्ट्रीय वृत्त वाहिनीच्या पत्रकाराने केल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान सदरचे ट्विट नाशिकच्या संदर्भाने असल्याची चर्चा सुरु असून लोकसभा निवडणूकीत सहभाग घेणारे नेते कोण याबाबत राजकीय चर्चेला उधान आले आहे. 

नाशिक लोकसभा निवडणूकीसाठी महायुतीत प्रचंड रस्सीखेच आहे, शिवसेनेची विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी प्रचारात आघाडी घेतली असताना राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे नाव पुढे आले आहेत, त्यांना मराठा समाजाचा तीव्र विरोध असल्याने निवडणुकीच्या बेरजेचे समीकरण जुळवण्यासाठी वेगवेगळे घटक सोबत घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असे असताना भाजप विरोधी समजली जाणारे वंचित ने राज्यात विविध ठिकाणी उमेदवार देण्याचा धडाका लावला आहे, त्यानुसार नाशिक मध्ये वंचित ने उमेदवार दिला तर भुजबळांच्या मतांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. महायुतीचे उमेदवार म्हणून भुजबळ यांचे नाव पुढे आल्यानंतर नाशिक भाजपने गोडसे पाठोपाठ भुजबळांना विरोध करत उमेदवारीसाठी दावेदारी केली. म्हणून भुजबळ यांना उमेदवारी जाहीर झालीच तर भाजप विरोधी मतदार वळविण्यासाठी राजकीय डावपेच आखले जात आहेत, त्याचाच एक भाग म्हणून ही बैठक झाली असावी, या ट्विटचे वेगवेगळे कयास लावले जात असून निवडणूकीत सहभाग घेणारे दोन मोठे नेते कोण व लोकसभा निवडणुकीत कोणाला फायदा होणार यावर सोशल मिडीयावर चर्चा रंगल्या आहेत. 

संपुर्ण महाराष्ट्रात ओबीसी समाजासाठी लढणारे छगन भुजबळ यांच्या बाबतीत जर सदरचे ट्विट असेल तर लोकसभा निवडणूक संबंधित दुस-या समाजाचा नेता कोण याविषयी गुढ वाढले आहे, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा संदर्भ गृहीत धरला तर जरांगे यांनी मराठा समाजाचे अधिकृत कोणतेही उमेदवार लोकसभा निवडणुकीत नसल्याचे असे स्पष्ट केल्याने त्यांच्या संदर्भ दिसून येत नाही. त्यामुळे भुजबळ आणि महाविकास आघाडीचा एखादा नेता यांच्यात भेट झालीय का याबाबत उलटसूलट चर्चा सुरु आहे.

संबधित ट्विट मध्ये राज्याच्या राजकारणाला वेगळं वळण लागेल अशी घटना गेल्य़ा आठवड्यात घडली, दोन मोठ्या समाजाचे दोन महत्वाचे नेते गुप्त ठिकाणी भेटले आणि तडजोड करुन मोकळे झाले, या भेटीमुळे आगामी निवडणुकीतील संबंधितांचे लोकसभेचे मार्ग मोकळे होतील असं दिसतंय, या तडजोडीच्या राजकारणाच्या निमित्ताने तरुणांसाठी अधोरेखित करावी अशी बाब म्हणजे, नेते कधीही एक होतात म्हणून आपण एकमेकांचे गळे धरायचे नाहीत, नेते राजकीय फायद्यासाठी लोकांना झुंजवत असतात हे पुन्हा सिद्ध झाले , द्या आता आपापल्या समाजाच्या घोषणा. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *