सिन्नर टोल वेज चे व्यवस्थापक दिपक वैद्य यांनी सांगितले की, महिलांसाठी टोल नाक्यावर लवकरच हिकरणी कक्ष व सॅनिटरी वेडिंग मशीन ची व्यवस्था करुन देण्यात येईल असे आश्वासन दिले.
श्रीधर गायधनी
नाशिक । महिला हा समाजाचा कणा असून कुटुंबाची जबाबदारी सांभाळतांना अनेक महिलांकडून आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते, कष्टकरी महिलांनी आरोग्याबाबत जागृक राहून आपल्या आहारावर लक्ष केंद्रीत करावे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश युवक काॅंग्रेसच्या महासचिव दिपाली ससाणे यांनी शिंदे टोलनाका येथील महिला दिनाच्या कार्यक्रमात केले.
नाशिक सिन्नर टोल वेज येथे जागतिक महिला दिनानिमित्त शुक्रवारी (दि.8) मार्च रोजी महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात टोलवेज आस्थापनेत काम करणा-या महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिपाली ससाने तर प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ.काजल गीते, धनश्री गिते, कीर्ती गिते आदींनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
यावेळी ससाने म्हणाल्या की, सर्वच महिलांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे, वेळीच आरोग्य तपासण्या करुन योग्य उपचार घेणे आवश्यक आहे. महिलांनी पोष्टीक व प्रोटीनयुक्त आहार घेण्याची गरज असल्याचे ससाने म्हणाल्या. महिला दिनानिमित्त सिन्नर टोलवेज येथे कार्यरत असणाऱ्या महिलांना सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. टोलवेज कार्यालय आवारात प्रमुख पाहुणे व सन्मानित केलेल्या महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.