विविध कार्यकारी सोसायट्यांनी बदलत्या काळानुसार उत्पन्नाचे नवनवीन मार्ग शोधण्याची गरज असून पाथर्डी विविध कार्यकारी सोसायटीने केमिकल विरहित गुळ व वनौषधी चहा पावडर विक्री केंद्र सुरु करुन प्रगतीच्या दिशेने पाऊल
नाशिक रोड । जिल्हा बॅंकेच्या अंतर्गत गावातील खातेदार शेतक-यांना कर्ज व खत, बियाणे पुरवठा करणा-या विविध कार्यकारी सोसायट्यांनी बदलत्या काळानुसार उत्पन्नाचे नवनवीन मार्ग शोधण्याची गरज असून पाथर्डी विविध कार्यकारी सोसायटीने केमिकल विरहित गुळ व वनौषधी चहा पावडर विक्री केंद्र सुरु करुन एक पाऊल प्रगतीच्या दिशेने टाकल्याचे प्रतिपादन आ. सरोज अहिरे यांनी केले.
जागतिक महिला दिन व महाशिवरात्री निमित्ताने शुक्रवारी (दि.8) मार्च रोजी पाथर्डी विविध कार्यकारी सोसायटीत गुळ विक्री केंद्र व शासकीय कामकाजासाठी आवश्यक असलेल्या ई-सेवा केंद्राचा शुभारंभ आ. सरोज अहिरे यांच्या हस्ते करण्यात आला. पळसे येथील नाशिक हनी-बी फार्मर प्रोड्यूसर कंपनीत तयार झालेल्या गोडवा गुळाची माहिती कंपनीचे अध्यक्ष विष्णुपंत गायखे यांनी दिली.
यावेळी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन खंडू धोंगडे, व्हा.चेअरमन धनंजय गवळी, संचालक चंद्रभान कोंबडे, तानाजी गवळी, दत्ता डेमसे, बाबुराव डेमसे, विष्णु डेमसे, रामदास जाचक, भिमा हुल्लुळे, बाजीराव चव्हाण, शाम नवले, संजय जाचक, नाशिक हनीबी प्रोड्युसर चे अध्यक्ष विष्णुपंत गायखे, शिवराम गायधनी, अरुण पाळदे, राजाराम गायधनी, मोतीराम तिदमे, गणेश जाधव, माजी नगरसेवक सुदाम डेमसे, भगवान दोंदे, निवृत्ती गवळी, साहेबराव आव्हाड, पांडुरंग शिरसाठ, संजय नवले बाळकृष्ण शिरसाठ, सोमनाथ बोराडे, नामदेव बोराडे, दत्तु जाधव, बाळु बोराडे, भास्कर चुंभळे, शांताराम चुंभळे, बाजीराव चुंभळे, सयाजी चौधरी, रंगनाथ मोंढे, बाकेराव डेमसे, विष्णू गवळी, विजय डेमसे, सचिव हेमंत भरवीरकर आदी उपस्थित होते.