नाशिक । नाशिक रोडच्या जय भवानी रोड भागात लोकसहभागातून भव्य व सुंदर आकारास आलेल्या श्री तुळजाभवानी मंदिरात चैत्र शुद्ध सप्तमी ला श्री तुळजाभवानी मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा संपन्न होणार असून 9 ते 15 एप्रिल दरम्यान होणा-या विविध धार्मिक सोहळ्यात भाविकांनी सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
जयभवानी रोड भागातील युवकांनी 2009 साली एकत्रित येऊन 32000 चौरस फुट जागेवर श्री तुळजा भवानी मंदिर बांधण्याचा संकल्प केला होता, तब्बल 12 वर्षे हेमाडपंथी प्रकारातील मंदिराचे काम अविरत सुरू होते, सहा दरवाजे असलेल्या आधुनिक वास्तुशास्राच्या आधारावर 75 मीटर उंची असलेल्या उभारलेल्या मंदिरात तुळजापूर नंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठे मंदिर असलेल्या मंदिरात मुर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा 9 ते 15 एप्रिल दरम्यान होणार असून पं.पुज्य श्री गुरु प्रसाद महाराज अमळनेरकर, प.पुज्य स्वामी श्री माधवगिरी महाराज, प.पुज्य स्वामी श्री जयरामगिरी महाराज, यांच्या हस्ते होणार आहे, यावेळी यज्ञाचार्य वेदमुर्ती शांताराम भानोसे, प्रधानाचार्य वेदमुर्ती हेमंत धर्माधिकारी, वेदमुर्ती दिनेश गायधनी प्राणप्रतिष्ठेचे यज्ञाचार्य उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमात पुज्य स्वामी अण्णा गुरुजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
श्री. तुळजा भवानी मातेच्या मूर्तीची मिरवणूक मंगळवारी दिनांक 9 एप्रिल रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 7 वाजे या वेळेत दत्तमंदिर-धोंगडे मळा-जगताप मळा, तरण तलाव रोड-चव्हाण मळा- धुम्रवर्ण गणपती मंदिर-जयभवानी रोड- तुळजा भवानी मंदिर यामार्गाने शोभायात्रा काढण्यात येणार आहे, बुधवारी दिनांक 10 सकाळी 10 ते दुपारी 2.30 धार्मिक विधी करण्यात येणार आहे. गुरुवारी दिनांक 11 रोजी सकाळी 8 ते दुपारी 1 वाजे पर्यंत यज्ञ प्रारंभ करण्यात येणार आहे. दुपारी 3 ते सायंकाळी 6 दरम्यान देवता स्थापन पूजन, मंडप पूजन, विविध धार्मिक विधी व आरती, सायंकाळी 7 ते 9 वाजे दरम्यान हभप. योगीराज महाराज गोसावी यांचे किर्तन होणार आहे.
शुक्रवारी दिनांक 12 सकाळी 8 ते दुपारी 1 वाजता शांतिसूक्त देवता पूजन, अभिषेक, अग्नि मंथन, नवग्रह रुद्र स्थापना हवन व मंदीर वास्तू पूजन, दुपारी 3 ते सायंकाळी 6 दरम्यान प्रधान हवन शांतिक पुष्टी होम, पुष्प अर्चना, सायंपूजन आरती, सायंकाळी हभप. माधवदास महाराज राठी यांचे किर्तन आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी 13 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता शांतीसुक्त देवता पूजन, अभिषेकआर्चन, 108 कलशांची स्थापना, दुपारी 3 ते 6 वाजता शांतिकपुष्पी होम, ध्यानदीवास सायं पूजा, सायंकाळी 7 ते 9 हभप. अनिकेत महाराज मोरे देहूकर यांचे किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. रविवारी दिनांक 14 सकाळी शांतिसूक्त देवतापूजन, प्रधान होम, ब्रम्हशिला कुर्मशिला स्तापन, पिंडिका अधिवास, सुवर्ण रत्नादिनिक्षेप, दुपारी 3 ते 6 दरम्यान प्रधान हवन, शय्यादीवास, सायं पूजन आरती, सायंकाळी 7 वाजता हभप. निवृत्ती महाराज नामदास श्री क्षेत्र पंढरपुर यांचे किर्तन, सोमवारी दिनांक 15 रोजी सकाळी 8 वाजता शांतिसूक्त देवतापूजन, महाअभिषेक देवता सजवणे, प्रायश्चित होम, अत्तरांग हवन, बलिदान, कलश स्थापन, दंडध्वजारोहण पुर्णाहुती होणार आहे. मुख्य कार्यक्रमात दुपारी 12.30 वाजता मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कलशारोहण, दंडध्वजारोहण दुपारी 1 वाजता महाआरती होणार आहे, दुपारी 1.30 ते आपल्या आगमनापर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष शिवाजी सहाणे, कार्याध्यक्ष किशोर जाचक, सरचिटणिस सुभाष पाटोळे, उपाध्यक्ष रमेश थोरात, खजिनदार राजेंद्र गायकवाड, उपखजिनदार रविंद्र गायकवाड, उपसरचिटणीस कैलास कदम, विश्वस्त दिनेश खांडरे, रंजा पाटोळे, शिवाजी कदम, प्रमोद लोणकर, शिवाजी लवटे, पोपट पाटोळे, बाळासाहेब गायकवाड, दिलीप कदम, बाळासाहेब चव्हाण, किरण सहाणे, अनिल शिरसाठ, अरुण गायकवाड, पोपट चव्हाण, श्रीमती माया भागवत आदींनी आवाहन केले आहे. धर्मशास्रानुसार मंदिरात गुप्तदान करण्यासाठी 9 ते 15 एप्रिल दरम्यान विश्वस्त मंडळास संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.