ताज्या बातम्या राजकारण

महाजन संकटमोचन, रामराज्यात शेपटीला चिंधी लावू नये – आ.संजय 

 नाशिक । भाजपचे गिरीश महाजन हे नक्कीच संकटमोचन आहे, त्यांनी शेपटीला पुन्हा चिंधी लावून लंका जाळायच्या भानगडीत पडू नये, रामराज्य चांगले चालले आहे, ते नीट चालू द्या, महायुती कायमस्वरुपी टिकेल यासाठी प्रयत्न करावा असा टोला शिवसेनेचे आ.संजय शिरसाठ यांनी मंत्री महाजन यांच्या वक्तव्यावर लगावला. एका वृत्तवाहिनीवर विचारलेल्या प्रतिक्रियेवर शिरसाठ बोलत होते. 

महायुतीच्या नाशिक जागेवरुन शिवसेना, भाजप व राष्ट्रवादीत चढाओढ सुरु असून मोठा तिढा निर्माण झाला आहे, शिवसेनेचे खा. हेमंत गोडसे यांनी उमेदवारी जाहीर होण्यापुर्वीच प्रचार सुरु केला आहे, राष्ट्रवादी पक्षाची मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारी निवासस्थान असलेल्या देवगिरी बंगल्यावर बैठक सुरु आहे, बैठकीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आदी नेते उपस्थितीत आहे. नाशिकच्या काही पदाधिकारी यांना बोलावण्यात आले आहे.

नाशिक जागेवर भाजपने दावा करत भाजप चे मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक मध्ये तीन आमदार व सत्तर नगरसेवक असल्याने भाजप ला उमेदवारी मिळावी अशी मागणी केल्यानंतर शिवसेनेचे आ. संजय शिरसाठ यांनी अत्यंत खोचक प्रतिक्रिया दिली, दोन वेळा प्रस्थापितांच्या विरोधात शिवसेनेच्या उमेदवाराने लाखोंच्या मतांनी पाडले आहे, स्टॅन्डींग जागा शिवसेनेची असल्याने चांगल्या मतांनी निवडून आलेल्या उमेदवारालाच उमेदवारी मिळावी असे सांगून महाजन यांच्यावर निशाना साधला, भाजपचे मंत्री गिरीश महाजन हे संकटमोचन आहेत, त्यांनी शेपटीला पुन्हा चिंधी लावून लंका जाळायच्या भानगडीत पडू नये, सध्या रामराज्य चांगले चालू आहे, ते नीट चालू द्या महायुती कायमस्वरुपी टिकून राहील यासाठी महाजन यांनी  प्रयत्न करावा असा टोलाही शिरसाठ यांनी लगावला.

दरम्यान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना मला दिल्लीवरुन निरोप आला, मी फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याची प्रतिक्रिया दिली यावर संजय शिरसाठ म्हणाले की, केंद्रातून असा कोणताही सिग्नल मिळत नसतो, स्थानिक निरोप महत्वाचा असतो, स्टॅन्डींग खासदार जर शिवसेनेचा आहे, दोन वेळा चांगल्या मतांनी निवडून आला, त्याच उमेदवाराला पुन्हा उमेदवारी मिळावी हिच आमची ठाम भूमिका आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *