action athletics Blog ताज्या बातम्या राजकारण

जरांगे पाटील नाशिक मार्गे मुंबईकडे जाणार

नाशिक । मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत जरांगे-पाटील मुंबईकडे रवाना झाले असून आक्रमक झालेले जरांगे पाटील यांची प्रकृतीच्या कारणास्तव मुंबईकडे जावू नये म्हणून त्यांची समजूत काढण्यासाठी जालना, बांभेरी गावातील महिला व मराठा आंदोलकांनी गर्दी केली, यावेळी पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी फडणवीस यांच्यावर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सडकून टीका केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत जरांगे पाटील मुंबई येथील सागर बंगल्यावर जाण्यावर ठाम असून ते मुंबईकडे निघाले आहे. जालन्याच्या भांबेरी गावात नागरिकांनी जरांगे यांना थांबवून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र, यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत जरांगे म्हणाले की, मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मागितले तर त्यांनी स्वतंत्र आरक्षण दिले, मला दहा टक्के आरक्षण स्विकारायला सांगून हो म्हणायला लावण्यासाठी दबाव टाकला जात होता, मी ऐकत नाही म्हणून मला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत, सर्वात महत्वाचे म्हणजे सगेसोयरे आरक्षण मागितले, सरकारने आम्हाला सगेसोयरे नावाचे  गाजर दाखवले, सरकार ला मराठा आंदोलन झेपत नसल्याने कोर्टाला पुढे केल्याचे जरांगे यांनी सरकारवर घणाघात केला. जरांगे यांनी पत्रकार परिषदेतून फडणवीस यांना लक्ष केले, मराठा आंदोलक शांततेने आंदोलन केले तरी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहे. मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेणारे छगन भुजबळ, राणे, सदावर्ते, यांना फडणवीस यांनीच पुढे केल्याचा आरोप जरांगे यांनी केले. 

राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याशिवाय काहीही होत नाही, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला मराठ्यांपुढे झुकावेच लागणार आहे, राज्यात मराठ्यांनी आपली दहशत कमी पडू देवू नका, आरक्षणाच्या मुद्यावर मराठ्यांनी एक इंच सुद्धा कमी पडू नका, मराठ्यांच्या ऐकी ची दहशत कमी करण्यासाठी मराठ्यांची ऐकी फोडायचा फडणवीसांचा डाव आहे, मराठ्यांची ऐकी फोडू शकत नाही म्हणून माझ्यावर दबाव आणला जात आहे. 

मी सागर बंगल्यावर येतो तिथे फडणवीस आपण समोरासमोर बैठक घेवू असे थेट आव्हान जरांगे यांनी फडणवीस यांना दिले, ते पुढे म्हणाले की, मी भाजपवर बोलत नाही, फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलतोय, भाजपात काही मराठी नेते चांगले आहेत, अशा प्रकारे सरकारने मराठ्यांच्या विरोधात जावून राज्यात सत्ता येणार आहे का असा सवाल करत मी सागर बंगल्यावर चाललोय, देवेंद्र फडणवीस आपण समोरासमोर बोलू फक्त पोलिसांना मध्ये घेवू नका, पोलिसांना विनंती आहे, आम्ही शांततेत चाललो आहे, जी चर्चा होणार ती समोरासमोर होईल असा इशारा दिला. त्यामुळे जरांगे यांनी अचानक घेतलेल्या पवित्र्याने राजकीय खळबळ उडाली आहे. जरांगे पाटील व सरकार यांच्या भूमिकेवर महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *