Blog

सरकारने संयम ठेवलाय, आंदोलन कर्त्यांनी कायदा हातात घेऊ नये – मुख्यमंत्री

 नाशिक । मराठा आरक्षणावरुन जरांगे पाटील यांनी फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर ते मुंबईच्या दिशेने निघाले आहे, यावरुन राज्यात वातावरण तापले आहेत, यावेळी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आंदोलनाच्या मुद्यावर एकत्रित पत्रकार परिषद घेतली, यावेळी मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी आंदोलन कर्त्यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कोणीही कायदा हातात घेवू नये, अन्यथा कारवाई होईल असा इशारा दिला आहे. 

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की,  मराठा आरक्षणाची मी शपथ घेतली होती, त्याप्रमाणे मी धाडसी निर्णय घेतला, सुप्रीम कोर्टात रद्द झालेले आरक्षण पुन्हा देण्याचे काम केले, जे सुप्रीम कोर्टात ज्या बाबी मांडायला आलेले अपयश ती दूर करण्यासाठी मागासवर्ग आयोग स्थापन करुन त्यावर चार लाख लोक काम करत होते, 

मराठा आरक्षणाचा आम्ही शब्द दिला होता, त्याप्रमाणे इतर आरक्षणाला धक्का न लागता आम्ही दिले, तुम्ही तर आरक्षण दिले नाही, आम्ही प्रामाणिक दिले, पुर्ण पणे कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण दिले आहे. कोर्टाने ज्या बाबी मांडल्या त्यावर अभ्यासपुर्ण निरीक्षणे करुन तृटी दूर केल्या आहे, त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण दिले, ज्यांना कुणबी नोंदी सापडत नव्हत्या त्याच्या नोटीफिकेशन आल्या आहेत, त्यावर काम सुरु आहे, आम्ही कोणालाही फसवणार नाही, आरक्षणाचा निर्णय आम्ही घेतला आहे, तो टिकणारा आहे, ते कसे टिकेल यासाठी सरकारला मदत होणे अपेक्षित असतांना टिकणार नाही असे बोलणे योग्य नाही,

या राज्यात कायदा सुव्यवस्था पाळण्याचे काम सरकारचे आहे, सर्वांनी नोंद घ्यावी, आंदोलन कर्त्यांनी सरकारने दिलेल्या आरक्षणाचा विचार केला पाहिजे. सरकार सकारात्मक निर्णय घेतला आहे, पाच हजार लोकांना नोक-या देण्याचे काम सरकारने काम केले आहे. म्हणून राज्यात काही लोकांचे अराजकता माजविण्याचे कारस्थान कोणी करु नये, जनता सूज्ञ आहे, धनगर समाजाच्या बाबतीत चांगला निर्णय घेतला आहे. विरोधकांनी लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचे व सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करु नये.

मनोज जरांगे पाटील प्रामाणिक लढ्यात उतरलेले आहेत अशी आमची भावना होती, त्यांच्या सरसकट नंतर सगेसोय-यांची मागणी आल्यानंतर वारंवार मागणी मागण्या बदलल्या आहेत, त्यावर सरकार काम सुरु आहे, छप्पन मोर्चे शांततेत झाली, परंतू यावेळी आंदोलनात अनेक वेळा गालबोट लागले, मी जालन्यात गेलो, मी मराठा आरक्षणासाठी पुढे गेलो, मात्र, आता जरांगे यांच्या भूमिकेवर राजकीय वास येत आहे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या वर आरोप करत आहेत, ही संस्कृती महाराष्ट्राची नाही, राज्याची परंपरा नाही, त्यांना दहा टक्के आरक्षण मिळणे अपेक्षित नव्हते इतके सर्व दिलेले असतांना वातावरण खराब केले जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, आंदोलन कर्त्यांना कायदा हातात घेता येणार नाही, राज्यात हजारो आंदोलने झाली, प्रत्येकाने आपल्या मर्यादेत राहीले पाहीजे, कायद्यात राहिले पाहिजे, कोणाला त्रास होणार नाही, यांची जबाबदारी घ्यावी, या गोष्टीला कोणी जबाबदार असतील त्यांना बिलकुल माफ करणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *