आमदार सरोज अहिरे यांनी आपल्या माध्यमातून देवळाली कॅम्प-भगूर दरम्यानच्या रेस्ट कॅम्प रोड हा रस्ता काॅंक्रीटीकरण बनविण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन दिला आहे, त्याप्रमाणे रस्त्याचे काम सुरु आहे, काँक्रीटीकरण दर्जेदार होण्यासाठी काम झाल्यानंतर त्याचे क्यूअरिंग होण्यासाठी विशिष्ट कालावधी लागतो, काॅक्रीटीकरण मजबूत होण्यासाठी वाहनचालकांनी संयम बाळगणे आवश्यक आहे, संध्याकाळच्या वेळेस या भागात वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा असे आवाहन आ. सरोज अहिरे यांनी केले आहे.
देवळाली कॅम्प ( प्रतिनिधी ) देवळाली कॅम्प परिसरातील रेस्ट कॅम्प रोड परिसरात सुरु असलेल्या काॅंक्रीटीकरणाचे काम क्यूअरिंग होण्यापुर्वीच काही वाहनचालक अतिरेक करुन ओल्या रस्त्यावरुन वाहने घालत असल्याचे समोर आले आहे, शासकीय नियमानुसार आवश्यक कालावधीत या रस्त्यावरुन वाहनचालकांनी वाहने नेताना संयम बाळगावा असे आवाहन आ. सरोज अहिरे यांनी केले आहे.
येथील रेस्ट कॅम्प रोड परिसरात कित्येक वर्षांपासून रस्ता बनविण्याची मागणी होत होती, या रस्त्यावरुन 52 गावे व भगूर हे नाशिक शहराला जोडले गेले आहे, नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी आमदार सरोज अहिरे यांनी या भागात काॅंक्रीटीकरण रस्ता बनविण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन दिला आहे, त्याप्रमाणे रस्त्याचे काम सुरु आहे, याकामी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता वाहतूक नियंत्रित करण्यासाठी केलेल्या शिफारशी प्रमाणे शहर पोलीस उपायुक्त यांनी रस्ता बंद करण्या्साठीचे आदेश काढले होते. हि समस्या लष्कराकडून सायंकाळी आठ वाजेनंतर लष्करी भागातून प्रवेश देण्यात आलेला रस्ता बंद करण्यात येत असल्याने वाहनधारकांची गैरसोय होत होती. यावेळी अनेक वाहनचालकांनी नुकतेच काॅंक्रीटीकरण झालेल्या रस्त्यावर वाहने घातल्याचे समजताच आ. सरोज अहिरे यांनी देवळाली कॅम्प पोलिसांशी संपर्क साधला, आ.अहिरे यांनी स्वतः याठिकाणी जावून बॅरिगेट्स लावण्यास सांगितले, वाहतूक कोंडी झाल्याने लष्कराने कॅथे थिएटर भागातून पर्यायी रस्ता 24 तास उपलब्ध करुन देण्याची विनंती केली होती.
काँक्रीटीकरण दर्जेदार होण्यासाठी काम झाल्यानंतर त्याचे क्यूअरिंग होण्यासाठी विशिष्ट कालावधी लागतो, काॅक्रीटीकरण मजबूत होण्यासाठी वाहनचालकांनी संयम बाळगणे आवश्यक आहे, संध्याकाळच्या वेळेस या भागात वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालकांनी पर्यायी रस्त्याचा वापर करावा असे आवाहन आ. सरोज अहिरे यांनी केले आहे.