नाशिक तालुक्यातील नानेगाव, जाखोरी, मोहगाव, बाभळेश्वर, दुगाव, मनोली, वाडगाव, वासाळी आदी गावातील शेतक-यांना नोटीस न बजावता शेतजमिनीच्या सातबारा उता-यावर पाटचारी नोंद. देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांच्याकडून प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु असून या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत सदरच्या नोंदी रद्द करण्याची मागणी केली. उता-यावरील नोंदी रद्द करण्यासाठी अप्पर मुख्य सचिव श्रीराज गोपाल देवरा यांच्या दालनात बैठक , अधिकारी, शेतकरी उपस्थित होते.
नाशिक । देवळाली मतदारसंघातील अनेक गावातील जमिनींच्या सातबारा उता-यावर जलसंपदा विभागाच्या पाटचारी नोंदी रद्द करण्यासाठी आ.अहिरे यांच्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून महसुल विभागाचे अप्पर मुख्यसचिव यांच्यासह जलसंपदा अधिकारी, शेतकरी उपस्थित होते.
नाशिक तालुक्यातील नानेगाव, जाखोरी, मोहगाव, बाभळेश्वर, दुगाव, मनोली, वाडगाव, वासाळी आदी गावातील शेतक-यांना नोटीस न बजावता शेतजमिनीच्या सातबारा उता-यावर नोंदी करण्यात आलेल्या आहेत, तालुक्यातील अनेक गावात जलसंपदा विभागाकडून टाकलेल्या पाटचारी नोंदी रद्द करण्यासाठी देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांच्याकडून प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु असून या संदर्भात शुक्रवारी (दि.2) उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत सदरच्या नोंदी रद्द करण्याची मागणी केली, त्यानुसार उपमुख्यमंत्री पवार यांनी महसूल, जलसंपदा विभागाला तातडीने बैठक घेण्याचे निर्देश दिल्यानंतर अप्पर मुख्य सचिव श्रीराज गोपाल देवरा यांच्या दालनात झालेल्या बैठकीला आ.सरोज अहिरे, जलसंपदा सचिव बेलसरे, भूसंपादन उपसचिव सुनिल कोटेकर, अव्वर सचिव हेमंत डांगे यांच्यासह विविध गावातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी सकारात्मक चर्चा झाल्याचे आ. अहिरे यांनी सांगितले.