ताज्या बातम्या राजकारण

स्व पंडित मोतीलाल नेहरु यांनी त्र्यंबकेश्वर दर्शन घेतल्याची नोंद -खा राहुल गांधी यांना आनंद

नाशिक । त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या खा. राहुल गांधी यांना पौरोहित्य मनोज थेटे यांनी स्व. पंडित मोतीलाल नेहरू यांचे नाव वंशावळीत आढळून आल्यानंतर काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी आनंद व्यक्त केला. स्व. मोतीलाल नेहरु यांनी त्र्यंबकेश्वर येथे भेट दिल्याचा व गांधी घराण्याचा उल्लेख असल्याचे खा. राहुल यांना दाखविले.

स्व. पंडित मोतीलाल नेहरू हे माजी पंतप्रधान स्व. पंडित नेहरूंचे वडील होते. पंडित मोतीलाल हे अलाहाबाद येथील एक नामवंत वकील होते. त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात लक्ष घातले. १९२२ साली त्यांनी देशबंधू चित्तरंजन दास व लाला लजपत राय ह्यांच्याबरोबर काँग्रेस पक्षांतर्गत स्वराज पक्षाची स्थापना केली होती. स्व. पंडित मोतीलाल नेहरु यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेतल्याची नोंद आज राहुल गांधी यांना पाहायला मिळाली, पौरोहित्य थेटे यांनी राहुल यांना वंशावळीची सविस्तर माहिती दिली. 

काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांचे भारत जोडो-2 अभियान सुरु आहे, नंदूरबार, धुळे नंतर गुरुवारी (दि.14) नाशिक मध्ये दाखल झालेल्या यात्रेचे द्वारका सर्कल जवळ जल्लोषात स्वागत करण्यात आले, यावेळी सारडा सर्कल, दुधबाजार ते शालीमार दरम्यान झालेल्या रोड शो मध्ये हजारो समर्थक सहभागी झाले होते. रोड शो झाल्यानंतर खा.गांधी यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात जावून दर्शन घेतले, रुद्राभिषेक व आरती केली. यावेळी काँग्रेसचे नाना पटोले, राजाराम पानगव्हाणे, आ. हिरामण खोसकर, संपत सकाळे, कैलास मोरे, किरण भुसारे, रतिश टर्ले, नितीन जीवने आदी उपस्थित होते. देवस्थान विश्वस्तांच्या वतीने कैलास घुले, पुरुषोत्तम कडलग, रुपाली भुतडा, स्वप्नील शेलार आदींनी खा. राहुल यांचा सत्कार केला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *