नाशिक । केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या पक्षाला राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असे नाव दिल्यानंतर आज पक्षाला तुतारीवाला माणूस असे चिन्ह दिले आहे.
राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट पडले होते, यामुळे राष्ट्रवादी कोणाची हा दावा उभा राहीला, निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला मुख्य राष्ट्रवादी पक्षाचे नाव व घड्याळ असलेले चिन्ह दिले होते, त्यामुळे शरद पवार गटाने नवीन चिन्हाची मागणी केली होती त्यानुसार गुरुवारी (दि.22) केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असे नाव असलेल्या पक्षाला आता तुतारीवाला माणूस हे चिन्ह दिले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्या गटाला दिल्यानंतर त्या निर्णयाच्या विरोधात शरद पवार गटाने सर्वोच्य न्यायालयात धाव घेतली होती, त्यावर पुढील आदेश येईपर्यंत राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव व चिन्ह म्हणून तुतारीवाला माणूस यावर निवडणूका लढवावी लागेल.