Blog

लोकसभा निवडणुकीत मताधिक्य, राष्ट्रवादी कडून शाबासकीची थाप

नाशिक । लोकसभा निवडणुकीत नाशिक मधून महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे खा. राजाभाऊ वाजे आणि दिंडोरी मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे खा. भास्कर भगरे हे महाविकास आघाडीचे दोन खासदार प्रचंड मताधिक्याने निवडून दिल्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस पदाधिका-यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मुंबई येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,महिला प्रदेशाध्यक्ष रोहीणी खडसे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख, युवक प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग उपस्थित होते..

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडी च्या उमेदवारांना मिळालेली मते यांचा अहवाल राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष शाम हिरे, गणेश गायधनी यांनी वरिष्ठ नेत्यांसमोर मांडला, तसेच नाशिक लोकसभेच्या सहा पैकी तीन विधानसभा मतदारसंघात मिळालेल्या मतदानांचा अहवाल शहराध्यक्ष बाळा निगळ यांनी मांडला, बैठकीला नाशिक मधून प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, जिल्हा अध्यक्ष शाम हिरे, जिल्हा कार्याध्यक्ष गणेश गायधनी, शहराध्यक्ष बाळा निगळ, प्रदेश पदाधिकारी शाहू शिंदे, किरण भुसारे, दिनेश धात्रक, किरण कातोरे, संदिप भेरे, वैभव धांडे आदी उपस्थित सहभागी झाले होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *