ओझरखेड व पालखेड डावा कालवा परिसरातील शेतक-यांना जिल्हाधिका-यांचा दिलासा, सुधारित वीजबंदी आदेश
नाशिक । श्रीधर गायधनी
ओझरखेड व पालखेड कालव्यावरील गावांसाठी शेतीसाठी सिंचनाचे आवर्तन सोडण्याकरीता दिलेला कालावधीत वीज पुरवठा खंडीत करण्याचा कालावधी कमी करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काढण्य़ात आले आहे.
ओझरखेड धरणातून डावा कालव्यावरील गावांसाठी सिंचनासाठी 610 दलघफु पाण्याचे आवर्तन सोडण्याकरीता 17 डिसेंबर 2023 ते 17 जानेवारी 2024 या कालावधीत दिंडोरी, निफाड, चांदवड तालुक्यांमधील कालव्यालगतच्या गावांसाठी आवर्तन कालावधीत वीज पुरवठा खंडीत करण्येबाबत पारित करण्यात आले होते, सदर वीज पुरवठा खंडीत करण्याचा कालावधी कमी करुन 30 डिसेंबर 2023 असा करण्यात आला आहे. त्यात ओझरखेड डाव्या कालव्यावरुन अनाधिकृत पाणी उपसा करणा-या मोटारींचाच वीज पुरवठा दिनांक 30 डिसेंबर पावेतो खंडीत करण्यात यावेत. तसेच पालखेड धरणातून डाव्या कालव्यावरील गावांसाठी शेतीच्या सिंचनाचे 999 दलघफु व पाणी पुरवठा योजनांसाठी बिगर सिंचन 1000 दलघफु असे एकुण 1999 दलघफु पाण्याचे आवर्तन सोडण्याकरीता 12 डिसेंबर 2023 ते 20 जानेवारी 2024 पावेतो दिंडोरी, निफाड व येवला या भागातील वीज पुरवठा खंडीत करण्याचे आदेश देण्यात आले होते, यात बदल करुन दिंडोरी, निफाड व येवला तालुक्यांतील गावातील आवर्तन कालावधीत पालखेड डावा कालव्यावरुन अनाधिकृत पाणी उपसा करण्या-या मोटारींचाच वीज पुरवठा खंडीत करण्यात यावे असे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहे.