Blog

गावगुंडाकडून अतिक्रमण, संपुर्ण गावाचा मतदानावर बहिष्कार

नाशिक । देशभरात लोकसभा निवडणूक होत असताना राज्यातील 8 जागांवर मतदान सुरु आहे, परभणीतील बलसा खुर्द गावात सकाळी सव्वा दहा वाजे पर्यंत एकही मतदान झालेले नाही, गावगुंडाकडून अतिक्रमण केल्याच्या निषेधार्थ गावक-यांनी बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर लक्ष लागून आहे. 

परभणी जिल्ह्यातील बलसा खुर्द गाव हे 2009 साली पुनर्वसन करण्यात आले आहे, मात्र, गावाच्या बाहेरील भागात गावठाण व पाटबंधारे विभागाच्या जमिनीवर गावगुंडाकडून अतिक्रमण करुन झोपडपट्टी बसविण्यात आली आहे. त्या विरोधात ग्रामस्थांनी न्यायालयात धाव घेतली, न्यायालयाने सदर अतिक्रमण हटविण्याचे प्रसासनाला आदेश दिलेले असताना प्रसासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. तसेच या प्रकरणात कोणत्याही लोकप्रतिनिधी किंवा राजकीय पुढा-यांनी ग्रामस्थांना मदत केली नसल्याने मतदानावर बहिष्कार टाकण्यात आल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. ग्रामस्थांनी स्थानिक पातळीवर अतिक्रमण काढण्याचे पत्र दिल्याने आपसात वाद होण्याची शक्यता आहे. म्हणून ग्रामस्थांमध्ये प्रशासनाच्या विरोधात तीव्र भावना आहे. 2018 साली तहसीलदार, पोलीस अधिकारी व प्रशासनाच्या मदतीने 37 ते 38 पत्र्याचे अतिक्रमण केलेले शेड हटविण्यात आले होते, त्यानंतर काही दिवसांत अतिक्रमण पुन्हा जैसे थे झाल्यानेच ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 

दरम्यान अमरावती मधील मेळघाट परिसरातील आदिवासी भागात मुलभूत सुविधा पोहचल्या नसल्याच्या कारणास्तव सहा गावातील नागरिकांनी बहिष्कार टाकला आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *