Blog

दिवंगत नेत्या सत्यभामा गाडेकर यांचे 3 रे पुण्यस्मरण

नाशिक । शिवसेनेच्या दिवंगत नेत्या व माजी नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांच्या तृतीय पुण्यस्मरण निमित्ताने सुप्रसिद्ध कथाकर देवी वैभवीश्रीजी यांची श्रीमद देवी भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

नाशिकरोड भागातील गाडेकर मळा, जुना चेहेडी रोड नाशिकरोड येथे दि ०१ ते ०९ मे रोजी सायं. ०७ ते १० या वेळेत आयोजित करण्यात आलेले आहे. तसेच श्रीमद देवी भागवत कथे निमित्ताने ०१ मे रोजी सायंकाळी ०५ वाजेला भव्य शोभा यात्रा असुन त्यानंतर श्री गणेश आणि देवी -देवतांची स्थापना कथा महात्म्य व्रत महिमा, ०२ मे रोजी सुतजी, शौनक संवाद, व्यासजी तपश्चार्य, शंकराचे वरदान, भगवती ची अर्धशक्ती प्रकट, ०३ मे रोजी व्यासजीचे नवरात्रीचे वर्णन, श्रीरामाच्या चरित्राचे वर्णन, श्री राम, ब्रम्हा, विष्णू, महेश यांचे उपवास, ०४ मे रोजी श्री कृष्णाच्या देखव्याची कथा, नंद महोत्सव, प्रदूमनच्या जन्मपर्यंत कथा, ०५ मे रोजी भगवती चंद्रिका प्रगट, महाकाली प्रगट, लक्ष्मी, सरस्वती, शुंभ, निशुंभ, चंड, मुंड, रक्त बीज वध, ०६ मे रोजी सत्यव्रत कथा, राजा हरीश्चद्र वंश कथा, महागौरी, शंकभरी प्रगट, ०७ मे रोजी गंगा उगम, राधाकृष्ण, गंगा कथा, शिव पार्वती विवाह, ०८ मे रोजी सत्यवान सावित्रीची कथा, भागवती भुवनेशोरीचे रूप, भगवती लक्ष्मीचे समुद्रातुन दर्शन, ०९ मे रोजी सदाचारी गृहस्थाचा महिमा, रुद्रक्षचा महिमा, भस्म गायत्री पूर्वचरण कथा आणि कथा पूर्ण होणार आहे, तसेच भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

गेल्या दोन वर्षापासून गाडेकर परिवार महान विभूती कथाकर यांच्या कथाचे आयोजन करण्यात येणार  आहे. पंचक्रोशीतील भाविकांनी या कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन लक्ष्मण गाडेकर, मनीषा वझरे, योगेश गाडेकर, विशाल गाडेकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *