नाशिक । राष्ट्रवादीकडून नाशिकच्या जागेवर दावा कायम असल्याचे छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना आपला दावा कायम असल्याचे सांगत राजकीय खळबळ उडवून दिली आहे. भुजबळ यांनी आ.माणिकराव कोकाटे, प्रेरणा बलकवडे, माजी. खासदार देविदास पिंगळे यांच्या नावाचा उल्लेख केल्याने नवा ट्विस्ट तयार झाला आहे. राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून महिलांसाठी मोठे काम उभे केल्याने त्यांचा नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, महायुती कडून नाशिक मधून उमेदवारी जाहीर होण्यास वेळ लागत असला तरी शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी प्रचार सुरुच ठेवला आहे, एका बाजूला उमेदवारीसाठी धडपड सुरु असताना व उमेदवारी बाबत अनिश्चितता असताना दुसरीकडे गोडसे यांचे हजारो कार्यकर्ते प्रचारात सहभागी होऊन शहरासह, सिन्नर, इगतपुरी व पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागातील वाड्यापाड्यासह मतदारसंघात प्रचाराची दुसरी फेरी पुर्ण झाली आहे.
महायुतीकडून भुजबळ यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने शिवसेनेला रस्ता मोकळा झाल्याचे चित्र असताना मंगळवारी (दि.23) रोजी भुजबळ फार्म वर भुजबळ समर्थकांनी उमेदवारीसाठी जोर धरला आहे. त्यावेळी भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, भुजबळ म्हणाले की, माझ्या उमेदवारीने काही लोकांना अडचण होण्याची शक्यता असली तरी राष्ट्रवादीकडून अनेक लोक आहेत, त्यात माजी खा. देविदास पिंगळे, सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे आहेत, त्यापैकी कोणीही उमेदवार होऊ शकतो, असे सांगून दावा कायम केला आहे. दरम्यान, सोमवारी रात्री विद्यमान खा. हेमंत गोडसे व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून खा. हेमंत गोडसे यांचे नाव निश्चित होण्याची शक्यता वर्तविला जात आहे. दरम्यान, नाशिक जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून जिल्हाभर महिलांसाठी भरीव काम उभे केले आहे, पक्षीय कामकाज करताना महिला बचत गटाच्या माध्यमातून केलेल्या कामाची पावती म्हणून भुजबळांनी प्रेरणा बलकवडे यांच्या नावाचा उल्लेख केला.