आ.सरोज अहिरे यांच्या वतीने आयोजित सिंदखेड राजा सहलीला नाशिकरोड-देवळाली परिसरातील महिलांचा उदंड प्रतिसाद
श्रीधर गायधनी । नाशिक
नाशिक। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे नाशिकरोड-देवळाली भागातील शेकडो महिलांनी राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित सहलीसाठी महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला, दोन बस मधून बुलढाणा येथे गेलेल्या महिलांनी राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेल्या ठिकाणी जिजाऊ यांच्या पुतळ्याला अभिवादन केले, त्यानंतर महिलांनी ऐतिहासिक ठिकाणांना भेट दिली.
नाशिकरोड येथे राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त आयोजित एका कार्यक्रमात देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांनी आपल्या भाषणातून जाहीर केल्या प्रमाणे सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेण्यासाठी सहलीचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रमाणे रविवार दिनांक 28 जानेवारी सकाळी सहा वाजता सहलीला निघण्यापुर्वी नाशिकरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन महिलांनी छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या नावाचा जयघोष करुन अभिवादन केले. यावेळी आ.सरोज अहिरे, शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष शिवाजी हांडोरे, बाळासाहेब म्हस्के, माजी नगरसेविका संगिता गायकवाड आदींच्या हस्ते श्रीफळ वाढवून सहलीचा प्रारंभ केला.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी भेट देत अभिवादन करण्यात आले, त्यानंतर राजमाता जिजाऊ यांचे वडील लखोजीराजे जाधव व जिजाऊ यांच्या बंधूंच्या समाधीचे दर्शन घेतले, त्यानंतर रंगमहाल, मोती तलावाच्या बाजूच्या पठारावर असलेल्या राजमाता जिजाऊ सृष्टी सह इतर ठिकाणी महिलांनी भेट दिली.
जाखोरी गावच्या सरपंच मंगला जगळे, माजी नगरसेविका शितल माळोदे, कल्पना बोंदे, सुजाता बोदरे, कांचन चव्हाण, सिमा डावखर, ज्योती गोडसे, गायत्री पगार, प्रणाली कोठुळे, नानेगावच्या माजी सरपंच नंदा काळे, जनाबाई मोरे, मंगल कहांडळ, सुनिता कहांडळ, मंगल अनवट, जयश्री अनवट, सोनाली कहांडळ, भाग्यश्री कहांडळ, स्वाती पेखळे, नेहा पेखळे, कविता बर्वे, आरती गोडसे, रंजना पेखळे, अनिता पेखळे, माधुरी बर्वे, छाया पेखळे, हर्षली पेखळे, गायत्री पेखळे, ऋतुजा पेखळे, स्वराज पेखळे, कल्पना पेखळे, शोभा पेखळे, वर्षा खर्जुल, सुमन कोठुळे, अनिता कोठुळे, योगिता कोठुळे, संगिता लोणे, वृषाली लोणे, मनिषा हांडोरे, ज्योती हांडोरे, विमल हांडोरे, अलका हांडोरे, कांताबाई वाजे, पुनम कोठुळे, निलम कोठुळे, आरती कोठुळे, आरती गोडसे, नीता म्हस्के, सीमा म्हस्के, अनिता धुर्जड, आदीं महिला स्वयंस्फुर्तीने सहभाग होता.