Blog

मुख्यमंत्र्यांच्या बनावट सहीचे पत्र, पांजरपोळ पदाधिका-यांच्या विरोधात गुन्हा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बनावट सहीचे पत्र विभागीय आयुक्तांकडे सादर करुन शासनाची दिशाभूल व फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली असून श्री नाशिक पंचवटी पांजारपोळ पंचवटी, यांच्या व्यपस्थापक व पदाधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला 

नाशिक । पब्लीक अॅम्यूनिटी च्या प्रयोजनासाठी पांजरपोळ च्या जमिनीच्या भूसंपादनाचा मिळणारा मोबदला मान्य नसल्याचे सांगून अतिरिक्त दराने मोबदला मिळावा यासाठी चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बनावट सहीचे पत्र विभागीय आयुक्तांकडे सादर करुन शासनाची दिशाभूल व फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली असून श्री नाशिक पंचवटी पांजारपोळ पंचवटी, यांच्या व्यपस्थापक व पदाधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मौजे नाशिक येथील श्री नाशिक पंचवटी पांजारपोळ यांच्या मालकीचा सर्वे नंबर 288/3 पैकी मधील 37535 चौ. मी.आरक्षण क्रमांक 103 पब्लीक अॅम्यूनिटी या प्रयोजना करिता जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाकडे 10 आॅक्टोबर 2023 रोजीच्या पत्रान्वये प्रारूप निवाड्याने मिळणारा मोबदला रक्कम मान्य नसल्याचे सांगून अतिरिक्त भाववाढ मिळण्यासाठी विभागीय महसूल आयुक्त कार्यालयाकडे पाठवण्यात आला होता.  

पांजरपोळ व्यवस्थापनाने 12 मार्च 2024 रोजी पत्रान्वये सदर निवाड्याची सद्यस्थिती कळविणे बाबतचा अर्ज विभागीय आयुक्त कार्यालयास प्राप्त झाला होता, त्यानुसार पांजरपोळ व्यवस्थापनाने प्रस्तावास जोडलेले पत्राची मुळ प्रत मागितली होती, ती प्राप्त होत नसल्याचे कारणावरुन महसूल विभागाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने 9 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित झालेल्या पत्राच्या छायांकित प्रतीची चौकशी सुरु केली. 

त्यासाठी प्रभारी उप आयुक्त श्रीमती राणी ताटे यांची सदर पत्राची शहानिशा व चौकशी प्रकरणी नेमणूक केली. त्याप्रमाणे उपायुक्त ताटे यांनी प्रत्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबई येथील सचिवालयात संपर्क साधून माहिती घेतली असता सदर पत्र पाठवले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. यामुळे पांजरपोळ च्या व्यवस्थापकाच्या विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सही असलेले स्वाक्षरीचे खोटे व बनावट दस्त खरे असल्याचे भासवून शासनाचे आर्तिक नुकसान होणेकामी व दिशाभूल करुन फसवणूक केल्या प्रकरणी शासनाच्या वतीने तहसीलदार मिनाक्षी अर्जुन राठोड यांच्या तक्रारी नंतर नाशिकरोड पोलीस ठाण्यात पांजरपोळच्या व्यवस्थापक व पदाधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नितीन कोरडे हे तपास करत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *