नाशिक । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नाशिकच्या विकासासाठी हेमंत गोडसे यांना तिस-यांदा विजयी करा असे आवाहन माजी मंत्री बबनराव घोलप यांनी केले. विजय संकल्प दौ-यात महायुतीच्या भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, आरपीआय आदी घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी होते.
नाशिक लोकसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार खा. हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ रविवारी (दि.5) देवळाली मतदार संघातील जिल्हा परिषदेच्या चार गटातील आठ गणा तील संसरी, शिंदे, सामनगाव, ओढा, गिरणारे, देवरगाव, महिरावणी, विल्होळी या गावात विजय संकल्प दौरा आयोजित केला होता. खा. गोडसे यांच्या संसरी गावातून दौरा सुरु झाल्यानंतर शिंदे गावात नागरीक व कार्यकर्त्यांकडून स्वागत केले. खा.गोडसे, बबनराव घोलप, आदी पदाधिका-यांच्या उपस्थितीत येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन करुन पुष्पहार अर्पण केला, ढोलताशांच्या गजरात गोडसे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी माजी सरपंच गोरख जाधव, सदस्य बाजीराव जाधव, चेतन जाधव, नंदू कटाळे, आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी बबनराव घोलप यांनी विकास करण्यासाठी सक्षम असलेल्या खा. हेमंत गोडसे यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचे मतदारांना आवाहन केले. तर खा. हेमंत गोडसे यांनी मतदारांच्या सेवेसाठी सदैव उपलब्ध असल्याने नागरीक जोडले गेल्याचे घोलप यांनी सांगितले, ते पुढे म्हणाले की, यंदा खा. गोडसे यांना निवडून दिले तर केंद्रात राज्य मंत्री नव्हे तर कॅबिनेट मंत्री पद मिळणार असल्याने गोडसे यांच्या माध्यमातून मोदी साहेबांच्या नेतृत्वात नाशिकचा विकास होईल, म्हणून मतदारांनी गोडसे यांना भरभरून मतांनी निवडून द्यावे असे आवाहन घोलप यांनी केले.
यावेळी खा. गोडसे म्हणाले की, दहा वर्षात माझ्यावर नाशिककरांनी विश्वास टाकला आहे, लोकप्रतिनिधी कडून औद्योगिक वसाहतीचे प्रश्न, सामान्य माणसाला काय लागते यासाठी सातत्याने काम करत गेलो, काही अडचण आली तर माझ्यासाठी लोकप्रतिनिधी उपलब्ध असावे अशी साधी अपेक्षा असते, माझ्याकडे आलेल्या माणसाची समस्या काय हे बघत आलो, तो कोणत्या गटाचा, पक्षाचा, न पाहता उपलब्ध होत असल्याने माझ्यावर विश्वास टाकला आहे, म्हणून हि निवडणूक विकासाच्या मुद्यावर लढली गेली पाहिजे, या पाच वर्षाच्या कार्यकाळात सातत्याने लोकसंपर्कात होतो, कोरोना टेस्टींग लॅब नसल्याने आरोग्याचा प्रश्न होता, म्हणून तातडीने लॅब उपलब्ध करुन दिली. नाशिक मध्ये रेल्वे प्रकल्प, पुणे रेल्वे, केंद्रीय निवृत्त कर्मचारी व कुटुंबियांना आरोग्य सेवा उपलब्ध करुन दिली, समृद्धीला जोडणारा सहा पदरी रस्ता, कोरोना काळात केलेले कार्य, आदी सेवा देण्याचे कर्तव्य बजावले आहे, महानगर पालिका, सिन्नर, ईगतपुरी, त्र्यंबकेश्वर नगरपालिका, देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड, त्याचप्रमाणे 455 गावांचा विकास करण्यासाठी केंद्राकडून प्रतिवर्षी केवळ पाच कोटी रुपये निधी मिळत असतो, त्यावर अवलंबून न राहता विविध विभागाकडून शासनाच्या योजनांमधून हजारो कोटी रुपयांचा निधी उपल्बध करुन दिल्याने मोठी कामे केल्यानेच मतदार माझ्या पाठीशी ठाम उभे असल्याचे प्रतिपादन खा. गोडसे यांनी केले.
माजीमंत्री बबन घोलप, जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, शिवाजीराजे भोर, भाजपा महिला आघाडी जिल्हाप्रमुख राजश्री आहिरराव, उपजिल्हाप्रमुख सुनील गायधनी, योगेश म्हस्के,माजी सरपंच गोरख जाधव, योगिता आवारे, तालुकाप्रमुख लकी ढोकणे, भाजपा तालुकाध्यक्ष अतुल धनवटे, तनुजा घोलप, राजाभाऊ शेलार, शरद कासार, विष्णू बोराडे,दशरथ जाधव,तानाजी करंजकर, अनिल ढेरिंगे, उत्तम गायधनी, नंदू नरवडे, चेतन जाधव, विलास गायधनी, दत्ता आगळे, राजू नरवडे, गौरव विसपुते, पांडुरंग ढेरिंगे, इश्वर गायखे, गणेश घनदाट,केशव एखंडे, नंदू कटाळे, मधुकर नरवडे आदी उपस्थित.