Blog

देवळाली । इच्छुक सुनील पवार यांच्या पाठीशी पळसेकरांची एकजूट

नाशिक रोड । पळसे गावातील तालुका व जिल्हा स्तरावरील सर्व राजकीय पदाधिका-यांनी आपापले राजकीय अस्तित्व बाजूला ठेवून पळसे गावातील इच्छुक उमेदवार पत्रकार सुनील पवार यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन सर्व पक्षीय बैठकीत करण्यात आले. यावेळी पळसेकरांची एकजूट पाहायला मिळाली 

देवळाली मतदारसंघ ग्रामीण व शहरी भागात विभागला आहे, आज पर्यंत देवळालीवर शहरी उमेदवार लादले जात आहेत, शहरी उमेदवारांपेक्षा आपल्या गावचा आमदार झाल्यावर आपल्या ग्रामीण भागातील सर्व समस्या दूर होतील, अशी भूमिका कारखान्याचे माजी अध्यक्ष तानाजी गायधनी यांनी व्यक्त केली. शिवसेना उबाठा गटाचे नेते व व्यापारी बॅंकेचे संचालक जगनराव आगळे यांनी गावाच्या सोबत राहण्याची ठाम भूमिका घेतल्याचे जाहीर करुन सुनील पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगितले.

महाविकास आघाडी किंवा महायुती कडून अधिकृत उमेदवारी मिळावी यासाठी दोन्ही गटाकडेच प्रयत्न करावे, सर्व ग्रामस्थ एकत्र आले तर विजय निश्चित होईल, अधिकृत उमेदवारी मिळत असेल तरच सुनील पवार यांनी निवडणूक लढवावी, तसे असेल तर सर्व गावातून आर्थिक मदत करण्यात येईल असा ठराव करण्यात आला. यावेळी विष्णुपंत गायखे, कामगार नेते अशोकराव गायधनी, दिपक गायधनी, नवनाथ गायधनी, गणेश गायधनी यांनी आपापली भूमिका स्पष्ट केली. यावेळी उपस्थित सर्व ग्रामस्थांनी सुनील पवार यांच्या पाठीशी उभे राहण्याचा एकमुखाने निर्णय घेतला. माजी आमदार निवृत्ती गायधनी यांच्या नंतर गावाला संधी उपलब्ध होणार असल्याने ग्रामस्थांंमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

देवळाली मतदारसंघात माजी आमदार कै.निवृत्ती गायधनी यांच्यानंतर मतदारसंघ राखीव झाल्यानंतर प्रथमच पळसे गावातून उमेदवारी देण्यासाठी शुक्रवारी (दि.9) सकाळी मारुती मंदीरात ग्रामस्थांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उबाठा गटाचे उपजिल्हाप्रमुख जगनराव आगळे, शिवसेनेचे पदाधिकारी भैय्या मनियार, नासाकाचे माजी अध्यक्ष तानाजी गायधनी, ग्रामविकास मंडळाचे विष्णुपंत गायखे, सरपंच प्रिया गायधनी, कामगार नेते अशोकराव गायधनी, खरेदी विक्री संघाचे संचालक शरद गायखे, उबाठा गटाचे तालुकाप्रमुख दीपक गायधनी, माजी सरपंच देविदास गायधनी, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गणेश गायधनी, भाजप पदाधिकारी नंदू नरवडे, उपसरपंच भाऊसाहेब गायधनी, नवनाथ गायधनी, अजित गायधनी, नाना चौधरी, वैभव पतसंस्थेचे अध्यक्ष साहेबराव गायधनी, माधव गायधनी, ज्ञानेश्वर गायधनी, विशाल धोंगडे, बाळासाहेब सरोदे, जयंत गायधनी, विजय क्षीरसागर, शिवाजी गायधनी, विजय ढेरींगे, किरण गायधनी, भाऊसाहेब जाधव, संजय गायधनी, संदीप गायखे, उत्तम गायधनी, मदन गायकवाड, रमेश चंद्रमोरे, दत्ता सरोदे, अनिल गायधनी, रामकृष्ण गायखे, भास्कर गायधनी, रवी गायधनी, किरण चंद्रमोरे, आदी उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *