त्र्यंबकेश्वर : येथील मंदिरातील २०० वर्षापुर्वीचा त्र्यंबकेश्वराचा सहा किलो सुवर्ण पंचमुखी मुखवटा असून त्यात अधिक सोन्याची भर घालून अकरा किलो वजनाचा होणार आहे, त्यासाठी भाविकांनी सुवर्णदान करण्याचे आवाहन विश्वस्तांनी केले आहे. आजपर्यंत मुकुटासाठी १३०.६३ ग्रॅम सोने तसेच ११ लाख २४ हजार ६१६ रुपये देणगी प्राप्त झाल्याची माहिती दिली.
कुशावर्त तीर्थावर प्रत्येक सोमवारी अभिषेक करण्यासाठी पालखीतून निघणारा सुमारे ०६ किलो वजनाचा सुवर्ण पंचमुखी मुकुट हा जवळपास २०० वर्षांपूर्वीचा आहे. स्थानिक भाविकांनी व विश्वस्तांनी ह्या परंपरेत भर करावी म्हणून ११ किलो वजनाच्या सोन्यामध्ये नव्याने तयार व्हावा असे मत प्रकट केल्याने अनेक भाविकांनी स्वेच्छेने सदर मुकूटास सुवर्ण दान करण्यास सुरुवात केली आहे. पुढील ११ महीने सुवर्ण मुकूटासाठी सुवर्णदान स्वीकारण्यासाठीचे आवाहन देवस्थान तर्फे करण्यात आले आहे. आज पर्यंत १३०.६३ ग्रॅम सोने तसेच ११ लाख २४ हजार ६१६ रुपये देणगी सदर मुकूटासाठी प्राप्त झाली आहे.
देवस्थानचे चेअरमन तथा जिल्हा न्यायाधीश एन. व्हि. जिवणे, देवस्थानचे सचिव तथा मुख्याधिकारी डॉ. श्रीया देवचके, देवस्थानचे विश्वस्त कैलास घुले, रूपाली भुतडा, पुरुषोत्तम कडलग, स्वप्नील शेलार , मनोज थेटे, सत्यप्रिय शुक्ल यांनी केले आहे.
०१ एप्रिल २०२३ ते ०१ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत श्रावणमास, अधिकमास, कार्तिकमास दरम्यान भाविकांची प्रचंड गर्दी वाढल्याने देणगी दर्शन तसेच देणगी पावतीच्या माध्यमातून भविकांतर्फे देणगीस्वरूपात देवस्थानास एकूण २५,०२,८५,४५९/- रु. जमा झाले आहेत. कालावधीत देणगी दर्शनाच्या माध्यमातून एकूण १७,६१,७२,२०० व देणगी पावतीच्या माध्यमातून एकूण १,८२,८०,६७२ इतकी देणगी जमा झाली आहे.
अधिकमास आणि श्रावणमास या दोन महिन्याच्या कालावधीत एकूण ०५ कोटीच्या दरम्यान देवस्थानास उत्पन्न झाले होते. परंतु स्वेच्छा देणगी दर्शन, दानपेटी व साधारण देणगी पावती अश्या तीनही गोष्टींचे नियोजन विश्वस्त व व्यवस्थापक यांनी समतोल केल्याने भाविकांचे दर्शन सुलभ होत आहे.
उत्तर दरवाजा वर होणाऱ्या अधिक गर्दीचे नियोजन करण्याकरिता शिवनेरी धर्मशाळेच्या बाजूने स्वेच्छा देणगी दर्शन गेट करण्यात आले तसेच देवस्थानचे माननिय चेअरमन तथा जिल्हा न्यायाधीश श्री. एन. व्हि. जिवणे साहेब यांच्या आदेशाने श्रावणमास, अधिकमास व कार्तिकमास या महिन्यात काही कालावधी करिता व्हि. आय. पी. दर्शन बंद करण्यात आले होते.
त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर परिसरातील गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, गरजवंत व्यक्तीला आरोग्यविषयक मदत आणि पर्यटन वाढीच्या दृष्टीकोणांतून लवकरच नियोजन करणार आहे.
-पुरुषोत्तम कडलग, विश्वस्त