श्रीधर गायधनी । नाशिक
नाशिकरोड रेल्वे स्थानक ते साईनाथ नगर शिर्डी दरम्यान नवीन रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण तातडीने बंद करण्याची मागणी शेतक-यांनी खा. हेमंत गोडसे यांच्याकडे केली आहे. शहरी भागासह तालुक्यातील बागायती क्षेत्र बाधीत होणार असल्याने शेतक-याचा तीव्र विरोध आहे.
नाशिकरोडच्या पूर्व भागातून देवळाली, चाडेगाव, बाभळेश्वर, मोहगाव, चांदगिरी, आदी गावातील शिवारातून शिर्डी रेल्वे लाईनचे सर्वेक्षण सुरु आहे, या कामाला शेतक-यांनी तीव्र विरोध दर्शविला असून खा. हेमंत गोडसे यांची भेट घेत सर्वेक्षण तातडीने बंद करण्यासाठी निवेदन दिले. सदर रेल्वे मार्ग इंडिया बुल्स अर्थात रतन इंडिया प्रकल्पासाठी पुर्वी संपादित केलेल्या जागेतून करण्यात यावा अशी मागणी केली आहे. खा. गोडसे यांना निवेदन देतांना चेहडी, चाडेगाव प्रभाग क्रमांक १९ सर्व नगरसेवक व नागरिकबाभळेश्वर, मोहगाव, सरपंच उपसरपंच, व्यावसायिक व शेतकरी यांनी निवेदन देऊन सदर रेल्वे मार्गाला प्रखर विरोध केला यावेळी नगरसेवक पंडित आवारे, संतोष साळवे, राजेश जाधव, नितीन खर्जुल, रामभाऊ जाधव, नागरे, मानकर, वाघ, कैलास टिळे,अंकुश टिळे, समाधान टिळे , योगेश टिळे, सुनील टिळे , लखन टिळे, बंडू टिळे, चिंतामण टिळे, बाळासाहेब टिळे, शिवाजी टिळे , संजय टिळे, अनिल टिळे, ज्ञानेश्वर टिळे, मोहन टिळे, बबन टिळे, कचरू टिळे, किरण टिळे या सह शेकडो शेतकरी उपस्थित होते
पुणे रेल्वे मार्गाचे बेलतगव्हाण- नानेगाव भागातून संपादन झालेले आहेत, इंडियाबुल्स साठी रेल्वेने पैसे देऊन संपादन केले आहे, असे असतांना बागायती क्षेत्रातून पुन्हा रेल्वे मार्गासाठी संपादन योग्य नाही, मोहगाव, बाभळेश्वर व चांदगिरी गावे 100 टक्के बागायती असून क्षेत्रफळाने कमी आहेत, त्यात 90 टक्के शेतकरी अल्प भूधारक आहेत, त्यामुळे केंद्र शासनाने तीन गावांचे उदर निर्वाहाचे साधन हिरावून घेऊ नये, तसे झाल्यास तीव्र आंदोलन करुन सर्वेक्षणाला विरोध होईल, रमेश कटाळे, माजी सरपंच चांदगिरी.