शहरात खळबळ, मनपा प्रशासनाकडून हजारो नागरिकांची तपासणी
नाशिक । शहरात डेंग्यूच्या पाठोपाठ झिका व्हायरसचा रुग्न आढळून आल्याने खळबळ उडाली आहे, मनपा प्रशासन खडबडून जागे झाले असून, शहरात शेकडो नागरिकांच्या तपासणी केल्याचे प्रशासनाने सांगितले.
नाशिक शहरात 26 वर्षीय तरुणाला झिका व्हायरसची लागण झाली असून एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे, ज्या भागात रुग्ण आढळून आला आहे, त्यापासून काही किलोमीटर अंतरावरील 3480 घरांचे सर्वेक्षण केले असून 15718 नागरिकांचे नमुणे तपासले, त्या भागातील गरोदर मातांचे रक्त नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्याच प्रमाणे परिसरात पाणी साठवण केलेल्या 5317 घरांची पाहणी केल्याचे मनपा प्रशासने माहिती दिली. सदर रुग्णाची तब्बेत स्थिर असून सुधारणा झाल्याचे मनपा प्रशा्सनाकडून सांगण्यात आले.