action ताज्या बातम्या राजकारण

शिवसेना महिला आघाडी, युवती सेना मेळावा

नाशिक । लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमिवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे, पक्ष संघटना बांधण्यासाठी युवती सेनेच्या वतीने नाशिक शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात नाशिक लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील महिला आघाडी व युवतीसेनेच्या पदाधिका-यांचा मेळावा व आढावा बैठक संपन्न झाली. नाशिक मध्य, पुर्व व पश्चिम यांचा मेळावा नाशिक मध्यवर्ती कार्यालयात संपन्न झाला. तर देवळाली व सिन्नर, ईगतपुरी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व युवतींचा मेळावा सिन्नर चे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या संपर्क कार्यालयात संपन्न झाला. 

नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची तयारी करण्यासाठी पक्षाने पक्ष संघटना बळकट करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नेते आदित्य ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी युवासेना प्रमुख वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना महिला आघाडी व युवतीसेनेच्या पदाधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी (दि.29) रोजी शिवसेना उपनेत्या, युवासेना कार्यकारिणी सदस्या शितल शेठ देवरुखकर यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्र युवासेना युवती आढावा बैठक अंतर्गत नाशिक लोकसभा मतदारसंघातील पुर्व, पश्चिम व मध्य मधील युवासेना युवती पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला व येणाऱ्या निवडणुकीकरिता तसेच पक्ष बांधणी विषयी मार्गदर्शन केले, यावेळी नाशिक शहर व सिन्नर तालुक्यातील तरुणींनी युवतीसेनेत प्रवेश केला आहे. व्यासपीठावर विस्तारक विद्या सरमळकर, ग्रामीण विस्तारक योगिता गायकवाड, युवासेना युवती जिल्हा अधिकारी शिल्पा चव्हाण आदी उपस्थित होते.

शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात युवतीसेनेच्या नाशिक मध्य, नाशिक पुर्व, व नाशिक पश्चिम या मतदारसंघातील महिला, युवती उपस्थित होते, मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नवनिर्वाचित पदाधिका-यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *