नाशिकरोड । येथील सिंधी समाजाची अर्थवाहिनी असलेल्या झुलेलाल नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी रतन चावला तर उपाध्यक्ष पदी हरीश देवानी यांची एकमताने निवड करण्यात आली.
नाशिकरोड भागातील कित्येक वर्षांपासून बंद असलेल्या झुलेलाल पतसंस्थेला उर्जितावस्थेत आणण्यासाठी प्रयत्न करणारे रतन चावला यांच्या नेतृत्वातील पॅनलने 13 फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवला होता, मुख्य शाखेत गुरुवारी (दि.7) अध्यक्षपदाची निवड आयोजित करण्यात आली होती.
निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झुलेलाल पतसंस्थेचे व्यवस्थापक रमेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली झुलेलाल पतसंस्थेची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची प्रक्रिया पार पडली. पतसंस्थेचे अध्यक्ष रतन चावला, उपाध्यक्ष हरीश देवानी यांचा सत्कार अधिकारी प्रदीप महाजन यांनी केले.
अध्यक्षपदी रतन चावला यांचे एकमेव अर्ज असल्याने बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी संचालक रीतिका कालानी, डॉ. कंचन लोकवानी, हेमंत वाजिराणी, किशोर कारडा, चंद्रकांत वेन्सियानी, गोपाल सचदेव, पतसंस्थेचे इतर संचालक आहेत.
यावेळी कन्हैयालाल माखिना, सेवकराम दर्डा, महेश बनसिंगानी, किशन पर्मानी, नानिक केसवानी , हरि देवानी, शंकर देवानी, देवी दीदी लखियानी, दिनेश बादलानी, जयराम चावला, सुंदरदास गोपालदास, राजेश मसंद, हिरो रिजवानी, हरीश वाजीरानी सह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.