नाशिक रोड । घोटी – सिन्नर महामार्गावरील साकूर फाटा परिसरातील कोठुळे लाॅन्स येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने दोन दुचाकींना जोरदार धडक दिल्याने दोन जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले असून पोलिसांत नोंद करण्यात आली असून दुचाकीस धडक देणा-या वाहनाचा तपास परिसरातील सीसीटीव्ही च्या आधारे सुरु असल्याची माहिती आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास सिन्नर कडून घोटीच्या दिशेने जाणारी दुचाकी एमएच 15 एचएस 6852 व एमएच 15 जीके 9314 या दुचाकी जात असताना समोरुन भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने दोन्ही दुचाकींना धडक दिल्याने अपघात घडला, अपघातात प्रकाश उल्हास टिळे, (35) रा. शेणित, सोमनाथ पांडुरंग सदगीर (36) रा. पारदेवी परिसर, हे दोघे जागीच ठार झाले तर गोकुळ किसन बिन्नर (38) रा. पारदेवी, सार्थक भास्कर जाधव (12) हे दोघे गंभीर जखमी झाले तर ओमकार प्रकाश टिळे (13) हा किरकोळ जखमी झाला आहे. जखमींवर एसएमबीटी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. असून पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
मयत प्रकाश टिळे हे मुळ मोहगाव येथे राहणार गरीब शेतकरी कुटुंबातील असून त्यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, असा परिवार आहे. सार्थक हा गंभीर जखमी असून ओमकार प्रकाश टिळे हि मुले जखमी असून त्यांच्यावर एसएमबीटी हाॅस्पिटल येथे उपचार सुरु आहे. मृत्यूस कारणीभूत असलेल्या वाहनाचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. मात्र, घरातला कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर मोठा प्रसंग ओढवला आहे. नातेवाईकांनी दोषी वाहनचालकाला अटक करुन कारवाई करावी तसेच टिळे कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने त्यांच्या कुटुंबाला विविध विम्याच्या माध्यमातून आर्थिक हातभार लावण्यासाठी मदत करावी अशी मागणी केली आहे.