Blog

कामगार पॅनल फिरसे, जुन्द्रे और गोडसे..!

नाशिक रोड । इंडिया सिक्युरिटी प्रेस व करन्सी नोट प्रेस मधील मजदूर संघाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत कामगार पॅनल ने आपला पॅनलचा धुव्वा उडवून पुन्हा एकदा निर्विवाद बाजी मारली आहे. सरचिटणीस पदी जगदीश गोडसे तर कार्याध्यक्ष पदी ज्ञानेश्वर जुन्द्रे, खजिनदार पदी अशोक पेखळे हे निवडून आले आहे. 

नाशिक मधील प्रतिष्ठेची समजली जाणारी निवडणूक म्हणून प्रेस मजदूर संघाच्या निवडणुकीकडे लक्ष लागून होते. मजदूर संघाच्या 30 जागा साठी निवडणूक होती, मात्र, अध्यक्षपदी जयवंत भोसले हे बिनविरोध निवडून आले होते, तर उर्वरित 29 जागांसाठी शनिवारी (दि.20) झालेल्या निवडणुकीत कामगार पॅनल विरुद्ध आपला पॅनल अशी लढत झाली होती, रविवारी (दि.21) सकाळी येथील ट्रेनिंग सेंटर मध्ये पासून मतमोजणीला प्रारंभ झाल्यापासून कामगारांची उत्सुकता वाढली होती. संध्याकाळी कामगार पॅनलचे सर्वच उमेदवार आघाडीवर होते, कामगार पॅनल समर्थक व उमेदवारांनी जल्लोष सुरु केला..

उपाध्यक्ष पदावर रामभाऊ जगताप, राजेश टाकेकर, कार्तिक डांगे, प्रवीण बनसोडे तर जॉईंट सेक्रेटरी पदावर संतोष कटाळे, नंदू कदम, राजू जगताप, अविनाश देवरुखकर, बबन सैद, डॉ. चंद्रकांत हिंगमिरे, कार्यकारणी सदस्याच्या 16 जागेवर मनीष कोकाटे, कांचन खर्जुल, दत्ता गांगुर्डे, विनोद गांगुर्डे, संजय गुंजाळ, संपत घुगे, सतीश चंद्रमोरे, सचिन चिडे, शैलेश जाधव, शंतनू पोटिंदे, दशरथ बोराडे, समाधान भालेराव, राजेंद्र वारुंगसे, संदीप व्यवहारे, रौप शेख, बाळू सानप हे विजयी झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उत्तम गांगुर्डे यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *