नाशिक । जय भवानी रोड, लॅमरोड भागात अनेक ठिकाणी रस्त्यालगत महावितरणच्या उघड्या विद्युत डीपी असल्याने लहान मुले वा पादचाऱ्यांना धोकादायक डीपींमुळे वीजेचा धक्का बसून अपघात होण्याची शक्यता असल्याने युवती सेनेच्या विस्तारक योगिता गायकवाड व पदाधिका-यांनी महावितरण विभागाला निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला होता.
धोकादायक डीपी मुळे अपघात होऊ नये यासाठी महावितरण ने तात्काळ दखल घेतल्याने युवती सेनेच्या योगिता गायकवाड यांनी महावितरण अधिका-यांचे आभार माऩले
नाशिकरोडच्या जय भवानी रोड परिसरातील सदगुरूनगर, डावखर वाडी, कमला पार्क, त्र्यंबक नगर, प्रधान नगर, कदम मळा, लॅमरोड आदी ठिकाणी रस्त्यालगत असलेल्या विद्युत डीपी उघड्या होत्या त्यामुळे अपघात होऊन जिवीतहानी होण्याची भीती असल्याने युवती सेनेच्या वतीने महावितरण विभागाला निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला होता,
निवेदनाची तात्काळ दखल घेत महावितरण कंपनीने शुक्रवारी (दि.19) उघड्या धोकादायक डीपी ला झाकण बसविण्यात आल्याने युवती सेनेच्या प्रयत्नांना यश आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.