नाशिक । लोकसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरु असताना नाशिकच्या जागेवर महायुतीकडून अद्याप पर्यंत उमेदवारी जाहीर न केल्याने गोंधळाची स्थिती आहे, नाशिक शिवसेनेची जागा असताना भाजप व राष्ट्रवादीने केलेल्या दाव्याने प्रचंड रस्सीखेच सुरु आहे, नाशिक, संभाजीनगर व ठाणे च्या जागेवर अंतिम तोडगा निघाल्याचे वृत्त आहे, त्यामुळे महायुतीकडून तिन्ही जागांचे उमेदवार काही वेळात जाहीर होण्याची शक्यता असून नाशिकची जागा कोणाच्या पदरात पडते याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान कोकणातील रत्नागिरी-सिंधुदूर्ग मधून भाजपचे नारायण राणे यांच्या नावाची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील 48 जागांपैकी महायुतीने आज पर्यंत भाजपने 24 शिंदे गटाचे 9 व राष्ट्रवादी पक्षाने 5 अशा जागेची घोषणा केलेली आहे. शिवसेनेच्या हक्काच्या नाशिक, संभाजी नगर व ठाणे मतदारसंघावर भाजप व राष्ट्रवादीने दावे केले आहेत. त्यावर अंतिम तोडगा निघाल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. शिवसेनेचे नाशिक मधून विद्यमान खा. हेमंत गोडसे, छत्रपती संभाजी नगर मधून संदीपान घुमरे तर ठाण्यातून प्रताप सरनाईक या उमेदवारांच्या नावे पुढे असून राष्ट्रवादी चे नेते छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा आहे, रामनवमीच्या दिवशी नाशिक मध्ये मंत्री छगन भुजबळ व विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे समोरासमोर आले असता गोडसे यांनी भुजबळ यांना आदराने नमस्कार केल्याने चर्चेला उधान आले होते. मंगळवारी (दि.17) नाशिक सह संभाजी नगर व ठाणे च्या जागेवरील दावे हे कपातील वादळ असल्याची प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर रात्री उशिरा महायुतीच्या झालेल्या बैठकीत तोडगा निघाल्याचे वृत्त असून शिवसेनेच्या उमेदवार जाहीर होण्य़ाची शक्यता वर्तविली जात आहे.
दरम्यान, महायुतीकडून रत्नागिरी-सिंधुदूर्ग मध्ये महायुतीचे उमेदवार नारायण राणे असले तरी आम्ही प्रचार करु अशी भूमिका घेत मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, सामंत म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आम्ही निर्णय घेतला आहे, महायुतीकडून तिकीट वाटपावर चर्चा सुरु असताना फाॅर्म भरण्याची वेळ आलेली असताना उमेदवार जाहीर नसल्याने मतदार संभ्रमात आहे, म्हणून रत्नागिरी-सिंधुदुर्ग च्या जागेवर महायुतीचा जो उमेदवार असेल त्याचा प्रचार करु अशी भूमिका स्पष्ट केली, इंडिया अलायन्सचे खासदार निवडून येणार नाही हे आमचे धेय्य आहे, त्यामुळे आम्ही भूमिका घेतली आहे, किरण सामंत यांचा महायुतीत सन्मान ठेवला जाईल, मनाचा मोठेपणा दाखवत सावंत यांनी माघार घेतल्याचे सांगितल्याने राणे यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे.