एजुकेशन

मातोश्री अभियांत्रिकी ला एन बी ए मानांकन


मातोश्री शिक्षण संस्थेचे मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशोधन केंद्र नाशिक च्या माहिती तंत्रज्ञान आणि विद्युत अभियांत्रिकी शाखेला नॅशनल अक्रिडिटेशन बोर्ड नवी दिल्ली चे मानंकन मिळाले आहे. एन बी ए ही देशातील शैक्षणिक गुणवत्ता दर्जा सुधारण्या साठी कार्यरत असून विविध निकषावर गुण देऊन शाखानिहाय गुणवत्ता ठरवली जाते. महाविद्यालयातील अध्यापन आणि अध्ययन पद्धती, मूलभूत सुविधा, प्लेसमेंट, शिक्षक, संशोधन, विद्यार्थी निकाल अशा विविध मापदंड लावून परीक्षण केले जाते. नोव्हेंबर महिन्यात पाच तज्ज्ञानी महाविद्यालयात येऊन पाहणी केली त्यानुसार माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिकल शाखेला मानाकंन देण्यात आले. मातोश्री अभियांत्रिकी च्या संगणक, यांत्रिकी आणि अणू विद्युत दुरसंचार शाखा मागील वर्षीचं अकॅरीडिटेड झाल्या आहेत.शहरापासून दुर ग्रामीण भागात असूनही पाच शाखा एनबीए कडून अकॅरीडिटेड होणे हे अभिमानास्पद आहे असे प्राचार्य डॉ. गजानन खराटे यांनी सांगितले सदर यशाबद्दल संस्था अध्यक्ष नरेंद्र दराडे, किशोर दराडे, सचिव कुणाल दराडे यांनी सर्वांचं अभिनंदन केले आहे.

पंधरा वर्षाच्या कमी कालावधीत आपल्या गुणवत्तेच्या जोरावर मातोश्री शिक्षण संस्था ज्ञानदाना चे दर्जेदार कार्य करत आहे. विदयार्थ्याचा सर्वांगीण विकासा साठी आम्ही प्रयत्नशील राहू – कुणाल दराडे, सचिव, मातोश्री शिक्षण संस्था

शहारापासून दुर असूनही गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्त, अनुभवी शिक्षक वर्ग, उत्कृष्ट प्लेसमेंट या जोरावर नाशिक व परिसरात मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालय अग्रगण्य स्थानावर पोहचले आहे. भविष्यात ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुविधा प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करू -आमदार किशोर दराडे, अध्यक्ष मातोश्री शिक्षण संस्था

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *