एजुकेशन

जागतिक एड्स दिनी जनजागृती रॅली

जागतिक एड्स दिनी जनजागृती रॅली

 नाशिकरोड -जागतिक एड्स दिनाच्या पार्श्वभूमीवर  विहितगाव – देवळाली येथील लोकजागृती शिक्षण मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल शाळेतील विद्यार्थ्यांनी विहितगाव येथे शुक्रवारी दुपारी एड्स जनजागृती रॅली काढली. या रॅलीचे उद्घाटन लोकजागृती शिक्षण मंडळाचे सचिव प्रभाकर कासार यांच्या हस्ते आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळेच्या प्रांगणात झाले. त्यांनतर विद्यार्थ्यांची ही रॅली मथुरा चौक, शिवाजी चौक मार्गे विठ्ठल मंदिर, बौद्ध विहार, स्व. उत्तमराव हांडोरे चौक मार्गे पुन्हा शाळेच्या मैदानावर आल्यावर या रॅलीचा समारोप झाला. जागतिक एड्स दिनाच्या निमित्ताने विज्ञान शिक्षक सचिन दिवे यांनी एड्स आजाराबाबत घ्यावयाची काळजी, या आजाराविषयीचे समज गैरसमज, एड्स आजाराची कारणे, लक्षणे, उपाय याबाबतची शास्त्रीय माहिती विद्यार्थ्यांना दिली. प्रतिज्ञा बेलदार, संकेत गांगुर्डे या विद्यार्थ्यांनी देखील एड्स आजाराबाबत प्रबोधनात्मक माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रवींद्र राठोड यांनी केले. ज्योती डोंगरे, कोमल पाटोळे, महेंद्र वैष्णव, भोलू शिंदे, केशव साळवे आदींनी या कार्यक्रमाचे संयोजन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *