नाशिक ः तालुक्यातील हिंगणवेढे गावात एका मद्यपीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर हातात कु-हाड घेत दहशत माजविल्याने खळबळ उडाली होती, दरम्यान महिला सरपंच यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक तालुक्यातील हिंगणवेढे गावात शनिवारी (दि.2) दुपारी खासदार हेमंत गोडसे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विकासकामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता, त्यांच्या स्वागताची तयारी सुरु असताना ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच ज्योती कृष्णा नागरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी वामन विठोबा धात्रक हे नशेत कार्यालयासमोर शिवीगाळ करुन हदशत माजविण्याचा प्रयत्न करत सरपंच यांचे पती कृष्णा नागरे यांना शिविगाळ करत धमकी दिली.
दरम्यान कार्यक्रमात गोंधळ नको म्हणून नाशिकरोड पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, पोलीस पाटील व ग्रामस्थांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र बराच वेळ गोंधळ सुरु होता,