महिला लघु-उद्योजकांसाठी व्यासपीठ, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम, हजारो नागरिकांचा सहभाग
श्रीधर गायधनी-8888856677
माजी शिक्षण सभापती व शिखर स्वामिनी महिला संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा संगीता गायकवाड यांनी आयोजित केलेल्या विंटर फेस्टिवलच्या माध्यमातून नागरिकांना एकाच छताखाली गृहिणींनी स्वगृही उत्पादीत केलेल्या सर्व घरगुती उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी नाशिकरोड येथे शुक्रवारी (दि.5) जानेवारी रोजी बाल वैज्ञानिक श्रावणी पांढरे हिच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. महोत्सवात रक्तदान शिबीर, पत्रकार सत्कार समारंभ, गोमाता पुजन, अयोध्या येथील श्रीराम मंदीरातुन आलेल्या अक्षता मंगल कलशाचे पूजन, महिला क्रिकेट संघाचा सत्कार, आफ्रिकन ड्रम वादन, खाद्यपदार्थ, हस्तकला, गायन,आदी कार्यक्रमांचा समावेश होता.
कार्यक्रमाला खासदार हेमंत गोडसे, आमदार ॲड राहुल ढिकले दिपक बिल्डर्स चे दिपक चांदे, के जी आर ग्रुप चे विनय कर्नावट, हेमंत गायकवाड, अॅड. एन.जी. गायकवाड, राहुल राठी, योगेश पटेल, सुप्रसिद्ध व्यावसायिक निलेश पटेल, प्रमोद अग्रवाल, भाजपा मंडल अध्यक्ष शांताराम घंटे, माजी नगरसेवक प्रशांत दिवे, पंडित आवारे, सचिन हांडगे, अजित बने, विनय थोरात, वंदना शेवाळे, स्वाती भामरे, शितल माळोदे, शितल भांबरे, बापु सापुते, मराठी कलाकार किरण भालेराव आणि गायिका वर्षा एखंडे आदींची उपस्थिती होती. यावेळी नाशिकरोड शिवजन्मोत्सव समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष शिवाजी हांडोरे, सुनील पाटोळे, जयेश वाळके, नितीन पाटील, मंगेश पगार आदी पदाधिका-यांचा सत्कार संस्थेच्या वतीने संगीता गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला.
आमदार ॲड राहुल ढिकले यांनी आफ्रिकन ड्रम वर ठेका धरुन त्याचे वादन करत महिला सक्षमीकरणाच्या चळवळीत आपण सहभागी असल्याचे दाखवून दिले. उत्कृष्ट नियोजन आणि संयोजनाच्या पार्श्वभूमीवर आयोजिका संगीता गायकवाड आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना महिला उद्योजिकांनी धन्यवाद दिले असून भविष्यात शिखर स्वामीनी महिला संस्थेच्या माध्यमातून आयोजित सर्व उपक्रमांमध्ये सहभागी होणार असल्याचे मत व्यक्त केले आहे.