action lifestyle technology Video ताज्या बातम्या राजकारण

रेल्वे फायद्यात आणणा-या मालगाडी साठी स्वतंत्र ट्रॅक – दानवे

श्रीधर गायधनी । नाशिकरोड

भारतीय रेल्वेला प्रवासी वाहतूकीतून एक रुपयाच्या तिकिटाच्या मागे पंचावन्न पैसे तोटा सहन करावा लागत आहे, मालवाहतूकीतून रेल्वेला मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो, प्रवाशी व मालगाडी एकाच ट्रॅकवर धावत असल्याने फायद्यात आणणा-या मालगाडी साठी स्वतंत्र रेल्वे ट्रॅक टाकण्याचे काम हाती घेतल्याचे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. कामगार संघटनांनी रेल्वे राज्यमंत्र्यांकडे विविध मागण्याचे निवेदन दिले.

 येथील ट्रॅक्शन मशिन कारखाना परिसरातील रेल्वे व्हिल सेट निर्मिती कारखान्याचे उद्घाटन  केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते सोमवारी (दि.26) सकाळी करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भुसावळ मंडल प्रबंधक श्रीमती इती पांडे यांनी स्वागत केले, ट्रॅक्शन मशिन कारखान्याचे प्रबंधक अलोक शर्मा यांनी कारखान्याचा कामाचा आढावा घेतला, ट्रॅक्शन कारखान्यातील विविध कामगार संघटनांच्या वतीने दानवे यांचे स्वागत करण्यात आले, कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची उपस्थिती अधिक होती. नॅशनल रेल्वे मजदूर संघ, रेल कामगार सेना, आदी संघटनांच्या वतीने मंत्री दानवे यांना निवेदने देण्यात आली.

यावेळी रेल्वे राज्यमंत्री दानवे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2047 साली विकसित भारत कसा असेल यासाठी परिपर्ण प्लॅनिंग केले आहे, देश शंभर वर्षे पुर्ण करतांना भविष्यात लागणा-या गरजा लक्षात घेऊन इन्फ्रास्ट्रक्चर वर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी पायाभूत उभारणी सुरु केली आहे. आयफेल टाॅवर पेक्षा अधिक उंची असलेला 359 मीटर उंचीचा पूल भारतात बनवला गेला हा भारतीय रेल्वेचा गौरव आहे. मोदी साहेबांनी देशात इन्फ्रास्टक्चर वर लक्ष केंद्रीत केले आहे, त्याचाच एक भाग म्हणून वेस्टर्न रेल्वे मार्गावर प्रवाशी व मालवाहतूक करणारे रेल्वे ट्रॅक वेगळे करण्याचे काम हाती घेतले आहे, प्रवाशी वाहतूकीतून रेल्वे तोट्यात चालते, रेल्वे ला फायद्यात आणण्यासाठी मालवाहतूक वेळेत होणे आवश्यक आहे. ज्या शहराची कनेक्टीविटी अधिक त्या शहराचा विकास अधिक होत असल्याने रेल्वे प्रकल्पांच्या दृष्टीने महाराष्ट्रात नाशिक,पुणे व सोलापूर शहरांना विकासासाठी मोठी संधी आहे, मोदींच्या कार्यकाळात भूमिपूजन केले तर काम पुर्ण करुन उद्घाटन ही आमच्याच काळात होत आहे, यालाच विकास म्हणतात, काॅंग्रेसच्या काळात एक एक प्रकल्प पुर्ण होण्यास पंधरा ते वीस वर्षे लागत होती, ते काम पुर्ण होई पर्यंत त्या कामाचे खर्च चार पटीने वाढत होते त्यामुळे विकास दिसत नसल्याचे सांगून दावने यांनी काॅंग्रेसवर निशाना साधला, कार्यक्रमापुर्वी दानवे यांच्या हस्ते फित कापून कारखान्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर संपुर्ण कारखान्यात जावून रेल्वे व्हील सेट निर्मितीची माहिती घेतली यावेळी रेल्वे अधिकारी उपस्थित होते. 

कार्यक्रमाला भुसावळ विभाग प्रबंधक श्रीमती इती पांडे, मुख्य अभियंता एन. पी. सिंग, मुख्य कारखाना प्रबंधक अलोक शर्मा, नरेशपाल सिंग, अनंत सदाशिव, भाजपचे नेते लक्ष्मण सावजी, रमेश धोंगडे, दिनकर आढाव, उद्धव निमसे, पंडीत आवारे, जयश्री खर्जुल, बाजीराव भागवत, शिवाजी भोर, गणेश कदम, नितीन खर्जुल, हरिष भडांगे, सुनील आडके, निमा अध्यक्ष धनंजय बेळे, भाजप अध्यक्ष सुनील बच्छाव, शिवसेना महानगरप्रमुख बंटी तिदमे, रमेश गायकर, भाजप तालुकाध्यक्ष अतुल धनवटे, लकी ढोकणे, सुनील जाधव, विलास गायधनी, आदी उपस्थित होते.

रेल कामगार सेनेचे निवेदन रेल कामगार सेनेच्या वतीने रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना ट्रॅक्शन मशिन कारखाना व नवनिर्मित रेल्वे व्हील सेट निर्मिती कारखान्याच्या समस्यांबाबत निवेदन दिले, यावेळी मंडल उपसचिव भारत पाटील, संदीप नगरे, सुभाष सोनवणे, सचिन धोंगडे, किरण खैरनार, अक्षय गायकवाड़, ओमकार भोर, सी.डी.बोरसे, विवेक कांबळे, ज्ञानेश्वर निसाळ, मंगेश सायखेडे, लहू खलाने, सचिन चौधरी, दीपक साळवे, सचिन पाटील, जय आथिलकर, शरद काळे, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *