Blog

चंद्रपूरच्या ‘स्मार्ट ग्राम बिबी’ येथे नाशिक जिप पथकाचा अभ्यास दौरा

नाशिक : जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सीईओ अमिषा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर येथील जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथे अभ्यास दौरा जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. वर्षा फडोळ यांचे सोबत अधिकारी, ग्रामसेवक व निवडक गावातील सरपंच यांनी नाविण्यपुर्ण उपक्रम, विविध योजना राबविण्य़ाची कार्यपद्धती याचा अभ्यास केला. दौ-यात जिल्ह्यातील ईगतपुरी, त्र्यंबकेश्वर, निफाड, बागलाण, सिन्नर, नांदगाव व पेठ या तालुक्यातील निवडक ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, आदी सहभागी झाले होते. 

गेल्या दोन महिन्यांपुर्वी जि.प.च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. वर्षा फडोळ यांच्या मार्गदर्शनाखाली  जिल्ह्यातील काही तालुक्यातील सरंपच व पथकाचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता, त्यानंतर हा दुसरा अभ्यास दौरा असल्याने राज्यभरात ग्रामपंचायत स्तरावर विविध नाविण्यपुर्ण उपक्रमांचा अभ्यास करण्यासाठी दौरे आयोजित करण्यात आल्याने विकासाचा नवा मंत्र मिळत असल्याने सरपंच व ग्रामसेवकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

जिल्हा परिषद नाशिक व राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाचे अभ्यास पथक हे नागपूर महसुली विभागातील चंद्रपूर जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायत भेटी देऊन तेथील नाविन्यपूर्ण उपक्रम त्याचबरोबर विविध योजना राबवण्यासाठी कार्यपद्धती याबाबत अभ्यास दौरा संपन्न झाला. ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ वर्षा फडोळ यांच्या उपस्थितीत २६ रोजी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अभ्यास पथकाने चंद्रपूर जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींना भेट दिली.

जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर मोरे, गटविकास अधिकारी जगन सुर्यवंशी, अजितसिंग पवार, वंदना सोनवणे, बाल विकास प्रकल्प अधिकारी संजय कोंढार, पशुधन विकास अधिकारी डाॅ. आनंदा कुटे, शाखा अभियंता रविंद्र पवार, विस्तार अधिकारी प्रसाद देशमुख, काशिनाथ गायकवाड, ज्ञानेश्वर सपकाळे, निलेश भुजाळ, ज्ञानेश्वर क-हाळे, प्रणय हिरे, समन्वयक सुनिल पाटणकर, जिल्हा प्रशिक्षण समन्वयक राकेश वाघ, सहायक जिल्हा व्यवस्थापक गौरव सांगळे, मुख्यमंत्री फेलो जि.प.नाशिक प्रज्ञा कुर्डुकर यांच्यासह विविध गावचे सरपंच आहेत.

बापू जाधव( मेशी), अशोक खैरनार(आखतगाव), सुरेखा मोरे( कोकणगाव ), वैशाली पवार (आमोदे), नीता गोवर्धने (सांजेगाव), संध्या कटके(बारागाव पिंपरी), पंकज पाटील(बोरवट), राहूल बोरसे(तोरंगण), ज्ञानदेव पवार(चणकापूर), मोहिनी शिंदे(राजदेरवाडी), उमेश नागरे(दह्याणे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *