नाशिक । त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या हद्दीतील हनुमान प्रासादिक वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळाच्या जागेतील अतिक्रमण हटविण्यात आले. त्र्यंबकेश्वर च्या मुख्याधिकारी श्रिया देवचक्के यांनी काही दिवसांपुर्वीच अतिक्रमण धारकांना त्यांनी केलेले अतिक्रमण स्वतःच्या खर्चाने हटविण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती, त्यानुसार 30 जानेवारी रोजी दुपारी नगरपरिषदेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली, नगरपरिषदेचे अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थित जेसीबी च्या सहाय्याने अतिक्रमण जमिनदोस्त करण्यात आले.
Related Articles
जरांगे पाटलांवर आरोप करणारे बारस्कर प्रहार मधून बडतर्फ – आ. बच्चू कडू
नाशिक । मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचे सहकारी अजय महाराज बारस्कर यांनी पत्रकार परिषदेतून गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, बारस्कर यांच्या भूमिकेवर प्रहार पक्षाने बारस्कर यांना प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार वारकरी संघटने मधून बडतर्फ करण्यात आल्याचा पक्षादेश काढण्यात आला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण आंदोलनात सोबत असलेले […]
खा. गोडसेंच्या गाडीला दिल्लीत भीषण अपघात
दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यासाठी गेलेल्या खा. हेमंत गोडसे यांच्या वाहनाला पाठीमागून एका वाहनाने जोरदार धडक दिल्याने गोडसे यांच्या गाडीचा मागील भाग चक्काचूर झाला. सुदैवाने खा. हेमंत गोडसे व त्यांचे सहकारी बचावले असून कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही. नाशिक । नाशिक लोकसभेचे खा. हेमंत गोडसे यांच्या गाडीला दिल्लीत अपघात झाला असून दिल्लीतील वाहनाने […]
नाशिकरोडला चित्र प्रदर्शनाला नागरिकांचा प्रतिसाद
नाशिक । चित्रमंच आर्ट च्या वतीने नाशिकरोडला पीएन गाडगीळ एन्ड सन्स दालनात चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन चित्रकार राजेश सावंत, प्रेस कामगार नेते जगदीश गोडसे आदींच्या हस्ते करण्यात आले, नागरीकांचा प्रतिसाद मिळाला असून 30 मार्च पर्यंत खुले राहणार आहे. नाशिकरोडच्या पीएन गाडगीळ एन्ड सन्स दालनात चित्रमंच आर्ट च्या वतीने 16 ते 30 मार्च दरम्यान चित्रकार गौरी पवार, साहील बारमाटे, […]