action राजकारण

राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्षपदी यशवंत ढिकले

नाशिक । राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी यशवंत ढिकले व जिल्हा संघटक पदी ज्ञानेश्वर ढिकले यांची निवड करण्यात आली असून आ. सरोज अहिरे व माजी खासदार देविदास पिंगळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाची बांधणी मजबूत करण्याच्या सूचना पक्षाध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यानंतर ग्रामीण भागातील समस्यांची जाण असलेल्यांची निवड केली जात आहे. रविवारी (दि.11) राष्ट्रवादी कार्यालयात राष्ट्रवादीचे नेते व माजी खा.देविदास पिंगळे, देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते  जिल्हा परिषदेचे माजी सदस्य यशवंत ढिकले यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी तर संघटक पदी ज्ञानेश्वर ढिकले यांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, तालुकाध्यक्ष राजाराम धनवटे, अर्जुन टिळे, भास्करराव ढिकले, यशवंत ढिकले, बापू सुर्यवंशी, भाऊसाहेब ढिकले, विठ्ठल ढिकले, कुंदन ढिकले, मधुकर भवर, राहूल ढिकले, अनिकेत ढिकले, योगेश ढिकले, पवन कहांडळे, रमेश कहांडळ, साहेबराव पेखळे, आदी उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *