classic Video ताज्या बातम्या राजकारण

‘नो भाषण..ओन्ली संभाषण..’, निवृत्ती महाराजांचे लोकसभा मिशन..

नाशिक लोकसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत नाशिक शहरातील मध्य, पुर्व व नवीन नाशिक हे तीन आमदार भाजपचे आहेत, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे देवळाली मतदारसंघात आ.सरोज अहिरे, सिन्नर चे आ.माणिकराव कोकाटे तर ईगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघात राष्ट्रीय काँग्रेसचे आ. हिरामण खोसकर या तिघांनी भाजप विरोधी मते घेतलेली आहेत, त्यानंतर राज्यात शिवसेना व राष्ट्रवादीचे दोन-दोन शकलं झाल्याने मतदारांची वाटणी झाली असली तरी इच्छूकांची संख्या वाढली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते निवृत्ती अरिंगळे यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुकले आहे.

 

विहितगाव येथे रविवारी 11 फेब्रुवारी 2024 सकाळी राष्ट्रवादीचे नेते व व्यापारी बॅंकेचे जेष्ठ संचालक निवृत्ती अरिंगळे मित्र मंडळाच्या वतीने मिसळ पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार गट, मनसे, वंचित, सह सर्वच पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. मिसळ पार्टीत कोणतेही राजकीय भाषण व सत्कार समारंभ किंवा चर्चासत्राचे आयोजन केलेले नव्हते, सकाळी साडे नऊ पासून गर्दी सुरु होती, दुपारी दोन वाजे पर्यंत हजारो समर्थकांनी अरिंगळे यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती, यात महिलांची संख्या अधिक होती.

देवळालीच्या आमदार सरोज अहिरे, माजी आमदार जयंत जाधव, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, अर्जुन टिळे, विष्णुपंत म्हैसधुणे, राजाराम धनवटे, अनिल चौगुले, अॅड. गोरख बलकवडे, माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे, नाना महाले, माजी नगरसेवक शरद मोरे, बाजीराव भागवत, पंडीत आवारे, व्यावसायिक व भाजपचे पदाधिकारी हेमंत गायकवाड, मर्चंट बॅंकेचे उपाध्यक्ष व शिवसेना उबाठा गटाचे माजी नगरसेवक प्रशांत दिवे, माजी नगरसेवक रमेश धोंगडे, शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष शिवाजी हांडोरे, कार्याध्यक्ष बाळासाहेब म्हस्के, राष्ट्रवादीचे जगदीश पवार,  डाॅ.जाकीर शेख, भाजप तालुकाध्यक्ष अतूल धनवटे, पदाधिकारी सुनील जाधव, अशोक सातभाई, मंडल अध्यक्ष शांताराम घंटे, विकास भागवत, बाबूराव आढाव, नितीन खोले, भाजप जेष्ठ नेते प्रकाश घुगे, भाजप नेते सुनील आडके,

काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रतन जाधव, व्यापारी बॅंकेचे संचालक  विलास पेखळे, जगनराव आगळे, सुनील चोपडा, अशोक चोरडीया, बाबा सदाफुले, शिवसेनेचे राम गायकवाड, दिनेश म्हस्के, दिनकर आढाव, एन.डी. गोडसे, राष्ट्रवादीचे मनोहर कोरडे, शरद जगताप., इरफान शेख, अविनाश शिंदे, अय्युब शेख, अन्सार शेख, चैतन्य देशमुख, पी.बी.गायधनी, गणेश खर्जुल, संजय कोठुळे, आत्माराम आढाव, सुधाकर ओहोळ, शरद पवार गटाचे रमेश औटे. मधूकर सातपुते, लक्ष्मण मंडाले, विक्रम कोठुळे, रुपाली पठारे, सुरेखा निमसे, प्रणाली कोठुळे, नंदा अरिंगळे, भाजपचे निवृत्ती अरिंगळे, मोतीराम जाधव, काॅंग्रेसचे दिनेश निकाळे, रामकृष्ण झाडे, गंगाधर पोरजे, शरद पवार गटाचे गणेश गायधनी, बाळासाहेब हगवणे, जयराम हगवणे, राजू गायधनी, माजी नगरसेवक प्रभाकर पाळदे, विष्णुपंत गायखे, शाम हांडोरे, संदीप जाधव, अशोक ठुबे, वसंत अरिंगळे, विलास पेखळे, नाना नागरे, अॅड. बाळासाहेब आडके, राजाभाऊ बोराडे, निवृत्त पोलीस अधिकारी बाळासाहेब गायधनी, सोमनाथ बोराडे, बाळासाहेब मते, शाम गोहाड, मंगेश लांडगे, विनोद देशमुख, शाम खोले, निवृत्ती कोठुळे, महेंद्र पोरजे, राजेश आढाव, अॅड. मुकुंद आढाव, राहूल बोराडे, अॅड. प्रकाश ताजनपुरे, अॅड. सुदाम गायकवाड,  सुरेश गायकवाड, अॅड. सुरेश कोठुळे, दीपक वाघ, अशोकराव गायधनी, संजय हांडोरे, सुनील पाटोळे, चंद्रभान ताजनपुरे, अनिल हांडोरे, विलास धुर्जड, आदी उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *