नाशिक । व्हॅलेंटाईन डे स्पेशल मेलोडियस सुपर हिट गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवेश विनामूल्य असून रसिकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले असून प्रेक्षकांमधून 7 विजेत्यांना सेमी पैठणी जिंकण्याची संधी असल्याचे आयोजकांनी सांगितले.
नाशिक शहरातील साज कराओके व काबरा ग्रूप यांच्या संयुक्त विद्यमाने 11 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी सहा वाजता विशाखा हाॅल, कुसूमाग्रज स्मारक, गंगापूर रोड येथे व्हॅलेंटाईन डे स्पेशल मेलोडियस सुपर हिट गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमात स्थानिक गायकांसह मयुरी मुरूडेश्वर तर अॅन्कर शशांक कांबळे यांचा सहभाग असणार असल्याची माहिती शाम जाधव यांनी दिली. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून प्रेक्षकांच्या मधून 7 भाग्यवंत विजेत्यांना सेमी पैठणी जिंकण्याची संधी मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.