नाशिक । भाजप कडून महिला आघाडी सक्षम करण्यावर भर दिला असून नाशिक दक्षिण जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष पदाची जबाबदारी निवृत्त तहसिलदार राजश्री अहिरराव यांची तर भटके विमुक्त आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी मंदा फड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
देवळाली विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या इच्छुक डाॅ. राजश्री अहिरराव यांनी काही दिवसांपुर्वी तहसिलदार पदावर असतांना नोकरीला राजीनामा दिल्यानंतर भाजप पक्षात प्रवेश केला, अहिरराव यांचा जनसंपर्क पाहून भाजप ने नाशिक दक्षिण जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली आहे, दक्षिण जिल्हा अध्यक्ष सुनील रमेश बच्छाव यांनी नियुक्ती पत्र दिले आहे. दक्षिण जिल्ह्यात सिन्नर, ईगतपुरी, त्र्यंबक, दिंडोरी, देवळाली, पेठ, सुरगाणा या सात तालुक्यांची जबाबदारी दिली आहे.
भाजपच्या मंदा फड यांनी रेणुका महिला औद्योगिक संस्थेच्या अंतर्गत महिलांसाठी मोठे काम उभे केले आहे, नाशिकसह राज्यातील इतर जिल्ह्यात महिलांचे व भटक्या विमुक्त आघाडीचे मेळावे घेत असल्याने पक्षाने त्यांच्यावर जबाबदारी टाकली आहे, तसे नियुक्ती पत्र राज्याच्या भटके विमुक्त महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा वंदना यंगटवार यांनी दिले आहे.