नाशिक : गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असलेल्या मा. आमदार डॉ.अपुर्व हिरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडत शिवसेनेचे शिवबंधन हातावर बांधत शिवसेना (उबाठा) त प्रवेश निश्चित केला आहे.यासंदर्भात त्यांनी आज मुंबई येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत शिवबंधन बांधले.
दरम्यान हिरे यांचा प्रवेश निश्चित झाला असला तरी येत्या १५ नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे यांच्या नाशिकला होणाऱ्या जाहिर सभेत अधिकृत प्रवेश सोहळा होणार आहे. डॉ. अपुर्व हिरे यांच्या शिवसेना प्रवाशाने विधानसभा निवडणुकीत नाशिक पश्चिम मतदार संघातील राजकिय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ होणार असल्याने मतदारांसह राजकिय क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे.