विचारक्रांती वाचनालयाच्या वतीने स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन
नाशिक । तालुक्यातील जाखोरी येथील विचारक्रांती सार्वजनिक वाचनालयातर्फे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
नाशिक तालुक्यातील जाखोरी गावातील विचारक्रांती वाचनालयाच्या वतीने सात वर्षांपासून दरवर्षी राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. रविवार दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9 वाजता सदर स्पर्धेला सुरुवात होणार आहे. 15 ते 25 वयोगटातील राज्यातील युवक- युवतींना स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. ईच्छुक स्पर्धकांनी 7021099067 व 8411816162 ह्या क्रमांकावर आगावू सहभाग नोंदणी करणे आवश्यक आहे. स्पर्धेत अधिकाधिक स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन विचारक्रांती वाचनालयाचे अध्यक्ष सुहास खाडे, सचिव देविदास रजपूत, ग्रामपंचायत सदस्य विश्वास कळमकर व राहुल धात्रक ह्यांनी केले आहे.
स्पर्धेचे विषय
1.जीवन सुंदर आहे.
2. संत नामदेव: भारत जोडणारा दुवा.
3.संविधान, लोकशाही आणि जनता.
4.तुमची सर्व भाषणे ही क्रांती गीते ठरोत.
5.गावं: काल, आज आणि उद्या.
6.बांधापासून संसदेपर्यंत शेतकऱ्यांचा प्रश्नांचा प्रवास.
7.कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) एक आव्हान.
स्पर्धेची बक्षिसे
प्रथम क्रमांक 7000, द्वितीय क्रमांक 5000, तृतीय क्रमांक 3000, चतुर्थ क्रमांक 2000. सोबत सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरवविण्यात येणार आहे. शिवाय 1000 रुपयांची 5 उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येणार आहे.